Breaking News

सांगली जिल्ह्यातील घटना तरुणाचा पाठलाग करून हत्याराने वार करत खून ; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात

 सांगली जिल्ह्यातील घटना तरुणाचा पाठलाग करून हत्याराने वार करत खून ; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात 


 कुपवाडच्या तरुणाचा सांगलीतून थरारक पाठलाग करत धारदार हत्याराने वार करत निर्घणपने खून करण्यात आला. 

गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या चौघाना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यातील मृत आणि हल्लेखोरांची नावे अद्याप स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कुपवाडचा एक तरुण बुलेटवरुन जयसिंगपूरच्या दिशेने निघाला होता.

 सांगलीपासून काही तरुण त्याचा पाठलाग करत होते. उदगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर आल्यावर मृत तरुणाला काहीजन पाठलाग करत असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर तो बुलेट रस्त्यावर सोडून एका दुकानात शिरून लपून बसला. पाठलाग करणाऱ्या तरुणानी त्याला शोधून ओढ़त रस्त्यावर आणले. तेथे त्याच्यावर धारदार हत्यारानी सपासप वार केले. हल्ल्यामध्ये मृताच्या हाताची बोटे तुटून पडली. 

तरुण मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर हलेखोर जयसिंगपूरच्या दिशेने पळून गेले. घटना पाहणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयित चौघाना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसुन चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments