google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यात्वाचा राजीनामा, माढ्यात घडामोडींना वेग

Breaking News

मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यात्वाचा राजीनामा, माढ्यात घडामोडींना वेग

मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यात्वाचा राजीनामा, माढ्यात घडामोडींना वेग


सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेईना. भाजपनं  रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज 


झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी  भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यातून उमेदवारीसाठी निश्चित असलेले

 भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील वेगळी चूल मांडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच, दरम्यानच्या काळात मोहिते पाटल आणि शरद पवारांच्या  गाठीभेटीचं वृत्त समोर आलं होतं.

 त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील भाजपची साथ सोडून लवकरच थोरल्या पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता मोहिते पाटलांनी भाजपच्या पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे आता

 ते शरद पवार गटात प्रवेश करणार आणि म्हाढ्यातून निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.

एकेकाळी राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसतंय. पण सुरुवातीला काहीशी माघार घेतलेल्या शरद पवारांनी आता अखेर माढ्यामध्ये भाकरी फिरवली 

असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चा आता खऱ्या ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

 धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील थोरल्या पवारांची साथ देणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे.

माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. 

त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. 

त्यामुळे आतापर्यंत केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव माहिती होतं, आता धैर्यशील मोहिते पाटलांचंही नाव चर्चेत आलं आहे.

Post a Comment

0 Comments