google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वेणेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 127 जणांनी केले रक्तदान

Breaking News

वेणेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 127 जणांनी केले रक्तदान

 वेणेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 127 जणांनी केले रक्तदान


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वेणेगाव तालुका माढा या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना व

 ज्योतिबा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .त्यामध्ये 127 जणांनी रक्तदान केले

 .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद माननीय श्री शिवाजी राजे कांबळे यांनी बोलताना सांगितले की संघटनेचे हे काम अतिशय कौतुकास्पद आहे .

कोणत्याही कार्यात सातत्य टिकवणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ते काम जय मल्हार क्रांती संघटना व महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठान यांनी केले आहे .

              कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अंकुश जाधव सर जय मल्हार क्रांती संघटना उपाध्यक्ष यांनी करत असताना सांगितले

 की हा उपक्रम राबवण्याचे हे पाचवे वर्ष असून आज पर्यंत 477 जणांनी रक्तदान केले आहे .आम्हाला खूप अभिमान वाटतो की या उपक्रमामार्फत

 आम्ही लोकांची सेवा करू शकतो . जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सामाजिक कार्य खूप प्रगतीपथावर आहे.

        तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अष्टविनायक ग्रुपचे अध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदील, वेणेगाव चे सरपंच परमेश्वर भाऊ जठार ,सोसायटी चेअरमन अरुण कदम,

 वेणेगावचे माजी उपसरपंच किरण कदम ,जय मल्हार क्रांती संघटना शेतकरी आघाडी अध्यक्ष बापूसाहेब जाधव , ज्येष्ठ नेते मोतीराम बोडरे गुरुजी एकमत चे

 पत्रकार सागर कांबळे, रांजणी सरपंच सौ.संगीताताई पाटोळे , चव्हाण मेजर पिंपळनेर ,सदाशिव शिंदे, अतुल पाटोळे,संजू माने,दादा जाधव, 

अशोक चव्हाण, सोमा जाधव,महावीर मदने, राजाभाऊ चव्हाण ,नवनाथ चव्हाण, अतुल पाटोळे, बाळासाहेब मदने,भाऊ मसुगडे,शरद गुजले,

 बापू बोडरे,बाळासाहेब माने,सोमनाथ चव्हाण,पांडुरंग जाधव, भैय्या चव्हाण,रोहन जाधव,किरण जाधव,  राहूल मदने, महावीर शिंदे ,विजय चव्हाण, आकाश चव्हाण,बिभीषण माने , 

तानाजी मदने , समाधान जाधव घोटी, महावीर माने, युवराज चव्हाण,साहेबराव जाधव, बापू चव्हाण,रमेश माने, आपा मदने ,अविनाश चव्हाण, भैय्या चव्हाण, गणेश चव्हाण हे उपस्थित होते

 आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.राजू भोंग यांनी मानले.

     हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दिपक माने तसेच वेनेगाव मधील युवकांनी विशेष कष्ट घेतले

Post a Comment

0 Comments