google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अंबिकादेवीच्या धर्मशाळेची २५ गुंठे जागा बाजारू शिक्षणसम्राटाणे फुकटात लाटली ; ६० वर्षात भरले फक्त ६० रुपयांचे भाडे

Breaking News

अंबिकादेवीच्या धर्मशाळेची २५ गुंठे जागा बाजारू शिक्षणसम्राटाणे फुकटात लाटली ; ६० वर्षात भरले फक्त ६० रुपयांचे भाडे

अंबिकादेवीच्या धर्मशाळेची २५ गुंठे जागा बाजारू शिक्षणसम्राटाणे फुकटात लाटली ; ६० वर्षात भरले फक्त ६० रुपयांचे भाडे 


सांगोला : प्रतिनिधी ; शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोला शहर आणि संपूर्ण तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या अंबिकादेवी मंदिराच्या जवळील सुमारे २५ गुंठे जागेत अंबिकादेवीची धर्मशाळा आहे. त्याचा नगरपालिका घर नंबर १२२५ व ६०५ हा आहे.

 या धर्मशाळेच्या रिकाम्या असणाऱ्या खोल्या सन १९५२ साली नाममात्र भाड्याने केवळ १ वर्षासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भाड्याने घेतली होती. तेव्हापासून सन २०१४ पर्यंत या बाजारू शिक्षणसम्राट

 व यांच्या कुटुंबातील सदस्य हे नगरसेवक, नगराध्यक्ष, सुकाणू समिती पदावर,कार्यरत असल्यामुळे फुकटात लाटलेली अंबिकादेवी धर्मशाळेची सुमारे २५ गुंठे जागा, बांधकाम करून राजरोसपणे वापरत होते.

या सुमारे ६० वर्षाच्या कालावधीत २५ गुंठे जागेचे प्रतीवर्षी १ रुपया प्रमाणे ६० वर्षाचे ६० रुपये भाडे या शिक्षणसम्राट महाशयांनी सांगोला नगरपालिकेस अदा केले होते.

 २५ गुंठे धर्मशाळेच्या जागेत असणाऱ्या १५ खोल्यांसाठी १२ महिन्याचे केवळ १ रुपाया भाडे देवून या बाजारू शिक्षणसम्राट महाशयांनी आपण किती मोठे समाजकार्य करत आहोत

 याचे धडे सांगोला शहर आणि तालुका वासियांना देत आहेत. सत्तेचा गैरवापर कसा करायचा ?, मंदिराची जागा लाटून शिक्षण सम्राट कसे व्हायचे ?, प्रशासनाच्या नजरेत धूळफेक कशी करायची ?, 

आणि तरी एक निष्कलंक राजकारणी असल्याचा आव साळसूदपने कसा आणायचा याचा आदर्शच या बाजारू शिक्षणसम्राटाने आपल्या काळ्या कामाने घालून दिला आहे. २०१४ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते उमेश मंडले यांनी

 सांगोला नगरपालिके समोर तब्बल २८ दिवस धरणे आंदोलन करून सदरची अंबिकादेवी धर्मशाळेची जागा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या ताब्यातून काढून घेतली होती.

 परंतु या बाजारू शिक्षणसम्राटांनी राजकीय ताकद लावून ही अंबिकादेवी धर्मशाळेची जागा पुन्हा सांगोला नगरपालिकेची विशेष सर्व साधारण सभा बोलावून यामध्ये

  ठराव क्रमांक ११६/२०१४ दि.२६/८/२०१४ रोजी अन्वये ठराव करून काही हजार रुपये भाड्याने पुन्हा ९ वर्षासाठी भाडेपट्ट्याने घेतली होती.या ठरावाप्रमाणे धर्मशाळेची जागा

 भाड्याने देता येते किंवा नाही याची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. सदर ठरावाप्रमाणे भाडे मंजुरीसाठी मा. सचिव, नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना

 मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद यांनी पत्र क्रमांक जा.क्र.३०५७/२०१४ दि.१०/११/२०१४ अन्वये प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. परंतु सदर प्रस्तावाला ९ वर्षे उलटून गेली असतानाही मंजुरी मिळालेली नाही. 

त्यामुळे मा.विशेष सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ११६/२०१४ दिनांक २६/०८/२०१४ अन्वये,ठराव करून ९ वर्षासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या ठरावाची मुदत दि.२६/०८/२०२३ रोजी संपलेली आहे. म्हणून

मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला यांनी सदरची बेकायदेशीर ठराव करून दिलेली धर्मशाळेची जागा तातडीने ताब्यात घ्यावी. अशी मागणी आता माहिती अधिकार कार्यकर्ते उमेश मंडले यांच्यासह सांगोला शहरातील नागरिकातून जोर धरू लागली आहे. 

 मुदत संपलेली जागा पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन सांगोला नगरपालिका शिक्षणाचे बाजारीकरण थांबवणार का याकडेच आता संपूर्ण सांगोला शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments