google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! सोलापूरच्या सर्व उमेदवारांना निवडणूक कार्यालयाने काढली नोटीस; काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! सोलापूरच्या सर्व उमेदवारांना निवडणूक कार्यालयाने काढली नोटीस; काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

ब्रेकिंग न्यूज! सोलापूरच्या सर्व उमेदवारांना निवडणूक कार्यालयाने काढली नोटीस; काय आहे प्रकरण? जाणून घ्या.. 


सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व १३ उमेदवारांना निवडणूक कार्यालयाने नोटीस काढली आहे. 

अर्ज भरताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी राहिल्याने भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यासह सर्व उमेदवारांना नोटीस काढली आहे.

निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता २० एप्रिलपर्यंत करावी, असे नोटिशीत म्हटले आहे. उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते.

त्यात काही त्रुटी असल्यास नियमानुसार दुरुस्ती करण्याची संधी असते, अशी माहिती माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

प्रतीक्षापत्रातील त्रुटी अशा

१. प्रतिज्ञापत्राच्या प्रत्येक पानावर सही करणे आवश्यक असते. काही जणांनी काही पानांवर सही केली नाही. कला नाही.

२. काही ठिकाणी माहिती भरणे आवश्यक असताना लागू होत नाही, असे लिहले. इतरही काही किरकोळ त्रुटी आहेत. त्या सर्व त्रुटींची पूर्ता २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments