मोठी बातमी ! भगीरथ भालके यांनी दिला ‘या’ उमेदवाराला
पाठिंबा; मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळमध्ये वाढली ताकद
साेलापूर लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बीआरएस पक्षाचे नेते भगीरथ भालके यांचा पाठींबा मिळाला आहे.
यामुळे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विराेधात लढणा-या आमदार शिंदे यांचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत हंडोरे यांची उपस्थिती होते.
दरम्यान पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
बीआरएस पक्षाचे नेते भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिंदे यांना मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना एक लाख पाच हजार मतदान झाले हाेते. भालके गट आमदार प्राणिती शिंदेचा प्रचार करणार असल्याने त्याचा फायदा हाेईल अशी शक्यता आहे.
0 Comments