डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला येथे डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आमसभेमध्ये दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन..
सांगोला तालुक्यातील काही टंचाईग्रस्त गावांना व वाड्या वस्त्यावर पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी लावून धरली होती..
राज्य सरकारने सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केलेला असताना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात
अशी मागणी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केली होती.. त्या मागणीला यश आलेले असुन प्रशासनाने टंचाईग्रस्त भागांमध्ये पाण्याचे टँकर सुरु केले आहेत.
सदर टँकर शिरभावी जलशुद्धीकरण केंद्र,कटफळ मुख्य संतुलन टाकी,बुरलेवाडी मुख्य संतुलन टाकी,वाणीचिंचाळे मुख्य संतुलन टाकी
या ठिकाणी सदर टँकर भरण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली असुन.सध्य स्थितीला ३५ गावे व४ सहकारी संस्था यांना पाण्याची अडचण काही प्रमाणात दुर होण्यासाठी मदत होणारा आहे.
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या या मागणीला आलेले यश पहाता नागरीकांमध्ये डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रती कामाचा माणुस आहे अशी चर्चा ऐकायला मिळत आहे
*भाई दिपक गोडसे*
पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष
0 Comments