शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
केंद्र सरकारकडून सर्वसामान्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार विविध योजना राबवते. शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान निधी योजना राबवण्यात येते.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये लाभ मिळतो. शेतकऱ्यांना आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.
तप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पंतप्रधान किसान योजनेच्या हफ्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक निधी मिळतो. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 16 वाह हफ्ता हस्तांतरित करण्यात आला होता.
0 Comments