आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनूषंगाने सांगोला पोलीस ठाणेकडील आरोपींवर MPDA कायदयातंर्गत फौजदारी कारवाई
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनूषंगाने मा. पोलीस अधिक्षक साो, सोलापूर ग्रामीण यांनी सांगोला पोलीस ठाणे हददीतील गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांवर आळा घालण्यासाठी
तसेच कायदयाचा त्यांचेवर कडक व तात्काळ प्रतिबंधक कारवाई करणेसाठी आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे स्तरावर खालीलप्रमाणे कारवाई करणेत आलेली आहे.
१) आरोपी नाव. ऋषी उर्फ ऋषीराज सतिश बाबर, रा. सोनंद, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचेवर MPDA कायदयातंर्गत कारवाई करून त्यांस एक वर्षासाठी येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
२) सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार नाव समाधान दत्तु गोरे, रा महीम, ता र्सागोला, जि सोलापुर यांस एकुण ०२ वर्षाकरीता, मंगेश राजकुमार रायचुरे, रा नाझरा, ता सांगोला, जि सोलापुर
यांस २ वर्षाकरीता व शहाजी विलास माने, रा वाडेगाव, ता सांगोला, जि सोलापुर यांस १८ महीण्यांकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ वे
कलम ५६ प्रमाणे जिल्हा सोलापुर, सातारा, सांगली व पुणे येथुन हद्दपारीचे आदेश बजावण्यात आलेले आहेत.
३) सांगोला पोलीस ठाणे येथे फौजदारी प्रक्रीया संहीता १९७३ अंतर्गत
अ) कलम १०७ प्रमाणे एकुण ४३७ प्रस्ताव,
ब) कलम १०९ प्रमाणे ०१ प्रस्ताव,
क) कलम ११० प्रमाणे एकूण ३० प्रस्ताव,
ड) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ९३ प्रमाणे १२ प्रस्ताव पाठवीण्यात अलेले आहेत.
तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता तसेच कायदा व
सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सांगोला पोलीस ठाणेकडील उर्वरीत आरोपींतावर MPDA कायदयातंर्गत फौजदारी प्रक्रिया संहिता
अधिनियम १९७३ चे कलम १०७,११० प्रमाणे व महाराष्ट्र वारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ९३ प्रमाणे कारवाई करणेची तजविज ठेवलेली आहे. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सोो,
सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोो, मंगळवेढा विभाग मंगळवेढा व मा.पो.नि खणदाळे सोो, सांगोला पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणेकडील तपास पथक करीत आहे.
0 Comments