google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! शिंदे सरकारला फुटला घाम आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून सुमारे ९०० एकरवर जंगी सभा घेणार

Breaking News

ब्रेकिंग! शिंदे सरकारला फुटला घाम आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून सुमारे ९०० एकरवर जंगी सभा घेणार

 ब्रेकिंग! शिंदे सरकारला फुटला घाम आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून सुमारे ९०० एकरवर जंगी सभा घेणार


मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

 आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून सुमारे ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत जरांगे यांनी दिले आहेत. जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे.

 दरम्यान शिंदे सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. शिंदे सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण फसवे असून ते कोर्टात टिकणार नाही,

 असे जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत.

Post a Comment

0 Comments