google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..कृषीभूषण अंकुश पडवळे मारहाण प्रकरणी आरोपीकडून पिस्तूल दोन तलवारी जप्त,आरोपींना केले जेरबंद,मंगळवेढा पोलिसांची कामगिरी

Breaking News

मोठी बातमी..कृषीभूषण अंकुश पडवळे मारहाण प्रकरणी आरोपीकडून पिस्तूल दोन तलवारी जप्त,आरोपींना केले जेरबंद,मंगळवेढा पोलिसांची कामगिरी

 मोठी बातमी..कृषीभूषण अंकुश पडवळे मारहाण प्रकरणी आरोपीकडून पिस्तूल


दोन तलवारी जप्त,आरोपींना केले जेरबंद,मंगळवेढा पोलिसांची कामगिरी

मंगळवेढा :- कृषीभूषण अंकुश राजाराम पडवळे यांना शेतात गाळ काढण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपीकडून 

एक देशी पिस्तूल व दोन धारदार तलवारी जप्त करत आकाश इटकर,अंकुश इटकर,रवी इटकर सर्व रा. लक्ष्मी दहिवडी यांचा शोध घेऊन चौकशी करून तीन आरोपीला अटक करून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

सदरची घटना दि.6 मार्च रोजी रात्री 8:30 च्या सुमारास जुनोनी शिवारात घडली.याप्रकरणी अंकुश शिवाजी इटकर,रवी शिवाजी इटकर, करण शंकर इटकर (सर्व रा.लक्ष्मी दहिवडी ता.मंगळवेढा) अतुल इटकर,सुमित जाधव, आकाश इटकर  रा.सध्या पंढरपूर व इतर 2 ते 3 इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी अंकुश पडवळे व त्यांचा पुतण्या संग्राम सीताराम पडवळे व भाऊ किसन राजाराम पडवळे असे जुनोनी तलावातील गाळ (माती) काढून फिर्यादीच्या शेतामध्ये घालण्याकरिता घेऊन जात असताना आकाश इटकर, अंकुश इटकर, रवी इटकर, करण इटकर, 

अतुल इटकर,सुमित जाधव व इतर 2 ते 3 लोकांनी दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबीच्या चाव्या काढून घेऊन येथील गाळ काढायचा नाही या कारणावरून हातात तलवारी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमवून आकाश किसन इटकर 

यांने फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तूल दाखवून जीवच मारतो अशी धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षण रणजित माने हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

वरील तीन आरोपीकडून दोन धारदार तलवारी सह एक देशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात यश आले. इतर आरोपींचा शोध सुरू असून ही कारवाई पोलीस निरीक्षण

 रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे ,पो.कॉ.हजरत पठाण ,पो.कॉ.राजू आवटे,पो.कॉ. सुरज देशमुख यांच्या पथकाने केली,यापुढील तपास पोसई सलीम शेख करीत आहेत.

Post a Comment

0 Comments