google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ॲड. सोमनाथ काळे संपादीत "आठवणीतील आबासाहेब" पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

Breaking News

ॲड. सोमनाथ काळे संपादीत "आठवणीतील आबासाहेब" पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

ॲड. सोमनाथ काळे संपादीत "आठवणीतील आबासाहेब" पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन


भाई जयंत पाटील याच्या हस्ते प्रकाशन तर रोहित पवार मा. प्रविणदादा गायकवाड, डॉ. बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या

 निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचा सन्मान आणि बक्षीस

 वितरण समारंभ तसेच या स्पर्धेतील निवडक निबंधाच्या संकलन करून ॲड. सोमनाथ काळे संपादीत केलेल्या 'आठवणीतले आबासाहेब' या पुस्तकाचे पुस्तक प्रकाशन सोमवारी 

दि. ११ मार्च २०२४ रोजी सांगोला मार्केट कमिटी येथे होत आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.

 या मेळाव्याला मा.भाई जयंत पाटील, मा.आ. रोहित पवार मा. प्रविणदादा गायकवाड,  पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष 

मा.डॉ. बाबासाहेब देशमुख उपस्थित राहणार असून या मेळाव्यात व्यासपीठावर या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

 या स्पर्धेतील विजेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे 

विद्यार्थी गट

प्रथम क्रमांक - सुप्रिया भानुदास दिघे, द्वितीय क्रमांक - वैष्णवी सदानंद हालदांडे,

 तृतीय क्रमांक - स्वप्नील राजेंद्र शिंदे, 

उत्तेजनार्थ क्रमांक - दिशांत किशोर चीलवकर, लतिका राजेंद्र इंगोले

खुला गट

प्रथम क्रमांक - प्रा. डॉ. नागनाथ दत्तात्रय घोरपडे,द्वितीय क्रमांक - प्रा.विशाल भागवत सरतापे

,तृतीय क्रमांक - जयश्री यशवंत पाटील,उत्तेजनार्थ क्रमांक - आबासाहेब तुकाराम हाके, प्रगती पंडित भोसले.

अधिक माहितीसाठी विजेत्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.८५३०००१५५३ असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment

0 Comments