google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

Breaking News

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

 डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधी - रविवार दि.१० मार्च रोजी सकाळी १० वाजता डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सोलापूरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मा.श्री. सचिन बंडगर यांनी सांगितले

 कि अभ्यास करून ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. तसेच या कॉलेजमध्ये आपल्या भावनांची खूप गुंतागुंत आहे.

 त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व बळवंत महाविद्यालय विटाचे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रविण बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले

 कि माजी विद्यार्थी मेळाव्याचे योगदान नॅक मध्ये खूप महत्वाचे आहे. तसेच सजग समाज घडविण्याचे काम महाविद्यालय करत असते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.आ.डॉ. गणपतरावजी देशमुख व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव मा.श्री. श्रीनिवास येलपले यांनी केले.

 आणि पाहुण्यांची ओळख माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद पवार यांनी करून दिली. पाहुण्यांच्या ओळखी नंतर  प्रसिद्ध उद्योगपती मा.विजय राऊत, 

शहनशा मुजावर, निलकंठ लिंगे, गीता गुळमिरे, हणमंत श्रीराम, कु. खंडागळे, श्री. गडहिरे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

आय.क्यू.ए.सी. कोऑर्डिनेटर प्रा.डॉ. शंकर धसाडे यांनी सांगितले कि  'ज्ञान आणि संस्कार यांनी समृद्ध करणारे ठिकाण म्हणजे महाविद्यालय आहे'.

संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले

 कि विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यात शाळा, कॉलेज, संस्था आणि शिक्षक यांचे योगदान खूप मोठे आहे. 

तसेच कोणतीही गोष्ट निर्माण करणे खूप सोपे आहे पण ती टिकवणे व चालविणे खूप अवघड काम आहे.

 तसेच अनेक पिढ्या घडविण्याचे काम या महाविद्यालयाने केले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.दिपक शिंदे यांनी केले.

 सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य मा.दिपक खटकाळे, महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments