google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...सहाय्यक पोलीस निरीक्षकाची सुसाइड नोट आली समोर, या कारणामुळे संपवलं आयुष्य

Breaking News

धक्कादायक ...सहाय्यक पोलीस निरीक्षकाची सुसाइड नोट आली समोर, या कारणामुळे संपवलं आयुष्य

धक्कादायक ...सहाय्यक पोलीस निरीक्षकाची सुसाइड नोट आली समोर, या कारणामुळे संपवलं आयुष्य


बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी आयुष्य का संपवलं त्याचं कारण समोर आलं आहे.


आयुष्य संपवण्याआधी त्यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ही सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

 सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी परळी रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

सुभाष दुधाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. सकाळी रेल्वे स्थानकातील रुळावर मयताच्या शरीराचे दोन तुकडे आढळून आले.

 स्टेशन मास्तरांनी पोलीस प्रशासनाला बोलावून पंचनामा करून मृतदेह ताब्यात दिला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

सुभाष दुधाळ यांनी कौटुंबिक कारणातून टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजत आहे. दुधाळ यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधे

त्यांनी कारण सांगितलं. पुणे CID च्या EOW विभागात पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते. पोलीस दलातील अंतर्गत कलहाचंही त्याच्यावर होतं प्रेशर अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

एका प्रकरणात,चुकीचा तपास आणि कर्तव्यात कसूर केल्याचा, त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. हा ठपका चुकीचा असल्याची चर्चा होतीच, 

त्यामुळेही सुभाष दुधाळ अस्वस्थ होते. याशिवाय कौटुंबिक कारण असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments