खळबळजनक घटना...मामीच्या सौंदर्यावर भाळला भाचा; नकार मिळताच खून
नाशिक : एकतर्फी प्रेमातून भाच्यानेच मामीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही पती, मुले आणि भाचा यांच्यासमवेत नाशिक रोड
भागातील सामनगाव परिसरात राहत होती. भाचा हा उदरनिर्वाहासाठी त्यांच्यासोबत राहत होता. ६ मार्चच्या मध्यरात्री महिलेचा तिच्या भाच्याने खून केला होता.
त्यानंतर त्याने गळ्याभोवती चाकू फिरवून स्वत:ला मारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रयत्न बनाव असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी तांत्रिक संसाधनांचा वापर करून काही तासांतच महिलेच्या खुनाचा तपास लावला. पतीने पत्नीच्या खुनाची तक्रार नाशिक रोड पोलिसांमध्ये दाखल केली.
याआधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित भाच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिस त्याला अटक करणार
असल्याचे नाशिक रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आर. आर. शेळके यांनी सांगितले.एकतर्फी प्रेमामुळे मामी व भाच्यात वाद होत होते. त्याची मामी त्याला घरातून हाकलून देणार होती.
याच कारणातून भाच्याने मामीच्या मानेवर चाकूने वार करत तिची हत्या केली आणि स्वत:वरही वार करून बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस तपासात हा सगळा बनाव उघड झाला आहे.
0 Comments