नियमबाह्य स्कूल बसेसवर कारवाई करण्याची उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे जय मल्हार क्रांती संघटनेची मागणी !
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुका प्रतिनिधी ; सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या अनेक स्कुल बस ह्या अनफिट असल्याचे दिसून आले आहे. शिवाय अनेक स्कुल बसेसचा इन्शुरन्स एक्सपायर झालेला आहे.
PUC अद्यावत नाही.अनेक स्कुल बसेस अनफिट अवस्थेत आहेत. अनेक बसेस मध्ये प्रमाणापेक्षा जास्त विध्यार्थी बसवून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
अनेक चालकांकडे बस चालवण्याचा परवाना (बॅच बिल्ला )नाही. सांगोला शहर व तालुक्यातील अनेक स्कूल बस नियमांचे उल्लंघन करून चालवल्या जात आहेत.
त्यापैकी Mh-04-FK-1682, Mh-04-FK-9226, Mh-09-S-9887, Mh-45-9072, Mh-45-9093 ह्या बसेस नियमबाह्य चालवून विध्यार्थीच्या जिवाशी खेळ केला जात आहे. विध्यार्थ्यांनकडून वारेमाप बस भाडे वसूल केले जाते.
परंतु या बसेस सुस्थितीत ठेवल्या जात नाहीत. त्यामुळे सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शाळेच्या स्कुल बसेसची तपासणी करून नियम बाह्य चालवल्या जाणाऱ्या बसेस जप्त करण्यात याव्यात
अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश मंडले यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अकलूज यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments