सांगोला तालुक्यात नव्याने १८ तलाठ्यांची नियुक्ती-तहसीलदार
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला तालुक्यात नव्याने १८ तलाठ्यांची नियुक्ती झाली असून त्यापैकी १३ तलाठी
हजर झाल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली. २०२३ मध्ये शासनाने सरळ सेवा भरतीने
तलाठी पदाची परीक्षा घेतली होती. त्यातून निवड झालेल्यापैकी १८ नवीन तलाठी सांगोला तालुक्याला मिळाले आहेत.
तलाठी व त्यांचे सज्जाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे- श्री. प्रथमेश दत्तात्रय बाबर (मेथवडे), श्री. व्दिगविजय विजय पाटील (आगलावेवाडी), श्री. विशाल भावराव जाधव (सांगोला-१), श्रीम. नेहा दिलीप राऊत (अचकदाणी), श्री. विजय महारुद्र कुडले (वाढेगांव),
श्री. निखील मारुती शिंदे (वाटंबरे), श्री. रोहित राजाराम बसवाडे (बलवडी), श्री. लिंगराज विठोबा अलदर (चोपडी), श्रीम. स्नेहल नथाजी पाटील (डिकसळ), श्रीम. अदिती दत्तात्रय पाटील ( खवासपुर),
श्रीम. मर्रजिना सहभुसेन इनामदार (कडलास), श्रीम. प्रगती प्रभाकर माळी (वाकी घेरडी), श्रीम. अश्विनी बाबुराव कांबळे (जवळा), श्रीम. सोफीया एकुब पठाण (कटफळ), श्रीम. कोमल नामदेव दाऊंद
( तिप्पेहाळी), श्रीम. मयुरी दिलीप साळुंखे (कराडवाडी, कोंबडवाडी), श्रीम. अर्चना शामराव सांगोलकर ( जुनोनी), श्री. गौरव शशिकांत कुंभार (सांगोला-२) यांची नेमणूक झाली असून यापैकी १३ तलाठी हजर झाले आहेत.
0 Comments