google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पाचेगाव हत्या प्रकरणातील आरोपीस अटक रेशन कार्ड न दिल्याने आई-वडिलांचा खुन केल्याची माहिती.. ३६ तासांत गुन्हा उघडकीस

Breaking News

पाचेगाव हत्या प्रकरणातील आरोपीस अटक रेशन कार्ड न दिल्याने आई-वडिलांचा खुन केल्याची माहिती.. ३६ तासांत गुन्हा उघडकीस

पाचेगाव हत्या प्रकरणातील आरोपीस अटक रेशन कार्ड न दिल्याने आई-वडिलांचा खुन केल्याची माहिती.. ३६ तासांत गुन्हा उघडकीस आरोपी मुलास अटक..


अज्ञात आरोपीविरुध्द एक महिला आणि एक पुरुष अशा दोन जेष्ठ नागरीकाच्या दुहेरी खुनाच्या गुन्हयातील आरोपीचा कसोशीने शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणलेबाबत :-

दि. ०१/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०६:१५ वाचे सुमारास मौजे पाचेगाव बु॥ येथे वृध्द दांपत्याचा खुन झाल्याची माहिती मिळालेने पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह तात्काळ भेट दिली.

 सदर ठिकाणी सुशीला भिमराव कुंभार वय: ६५ आणि भिमराव गणपत कुंभार वय-७० यांची प्रेत मिळुन आले. त्यां दोघांचाही अतिशय निर्धारपणे खुन केल्याचे दिसुन आले.

 तात्काळ सदर ठिकाणी मा. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विकांत गायकवाड मंगळवेढा विभाग यांनी भेटी देवुन तपासाबाबत सुचना दिल्या. सोलापुर ग्रामीण कडील डॉग स्क्वॉड,

 फिंगर प्रिन्ट एक्स्पर्ट, फोरेन्सीक डिपार्टमेंट यांच्याकडुन घटनास्थळाव्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर दोन्ही प्रेते ग्रा. रु. सांगोला येथे आणुन पंचनामे करण्यात आले. त्यानंतर वैदयकिय तज्ञांच्या पथकाकडुन

 पीएम होणेकामी सिव्हील हॉस्पीटल सोलापुर येथे पीएम करीता पाठविण्यात आली. सिव्हील हॉस्पीटल येथील तीन डॉक्टरांच्या तज्ञांकडुन दोन्ही मयतावे पीएम करुन घेवुन मयताची स्पष्ट कारणे व अधिक माहिती प्राप्त करण्यात आली.

सदर गुन्हयात अज्ञात आरोपीने ०२/०३/२०२४ रोजी मयताचा नातु सागर रामबंद्र कुंभार रा. करगणी ता. आटपाडी जि. सांगली यांनी अज्ञात कारणाने दोघांचा खुन केल्याबाबत तकार दिलेने अज्ञात आरोपीविरुध्द वृन्द दांपत्याच्या दुहेरी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विकांत गायकवाड मंगळवेढा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः अधिनस्त अधिकारी अंमलदार तसेब स्था. गु. शाखेचे 

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि त्यांचे पथकांच्या पथकासह करीत असताना मिळालेली गोपनिय माहिती आणि पुरावे याचे अवलोकन करुन मयतावा मुलगा समाधान भिमराव कुंभार वयः४२ रा. पाचेगाव ता. सांगोला यास ताब्यात

 घेवुन अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर आईवडीलांचा खुन त्याचे स्वतः केला असल्याची कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे त्यास 

मा. न्यायालयाचे आदेशाचे पालन करुन रात्री उशीराने अटक केली. मा. न्यायालयात त्यास हजर केले असता दि. ०९/०३/२०२४ अखेर पोलीस कोठडी मंजुर झालेली असुन तपास आम्ही स्वतः

करीत आहोत. सदर गुन्हयात ६५ वर्षाची महिला आणि ७० वर्षाचा पुरुष अशा जेष्ठ नागरीक वृध्द दांपत्याचा अतिशय निर्धारपणे खुन केल्याबाबत 

अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद असताना, कोणताही पुरावा हाती नसताता मा. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, 

उपविभागीय पोलीस अधिकारी विकांत गायकवाड मंगळवेढा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस व स्थागुशा कडील पथक यांनी अतिशय कसोशीने तपास करुन सदर ३६ तासांत गुन्हा उघडकीस आणलेला आहे,

Post a Comment

0 Comments