महुद बु। येथील स्फोट कट कारस्थान रचुन इंश्युरंस कंपनीचा क्लेम मिळविण्याकरिता
विम्याचा सामुहीक आर्थीक लाभ घेण्याच्या उद्देशाने स्पोट घडविण्याचे पोलीस तपासात उघड
मौजे महुद शिवारातील नितीन पांडुरंग नरळे, वय ३८ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, ता. सांगोला यांच्या मालकीच्या गोडावूनमध्ये रामेश्वर दत्तात्रय बाड, वय ३४ वर्षे,
रा. विठ्ठलापूर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली ह.मु. गणेश टायर्स शोरूमच्या वर महुद बु।।, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचे एम. आर. एफ. टायरचे गोडावून होते.
त्या ठिकाणी दिनांक ०१/०३/२०२४ रोजीचे ०१:२१ वा. चे सुमारास अतिशय मोठा स्फोटासारखा आवाज होवून आग लागली होती, सदर
स्फोटात रामेश्वर बाड यांचा चुलत भाऊ अतुल आत्माराम बाड, वय २७ वर्षे, रा. विठ्ठलापुर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली हा स्फोटाच्या ठिकाणी डोक्याची कवटी फुटल्याने मरण पावला होता
तसेब रामेश्वर बाड यांचा मेहुणा दिपक विठ्ठल कुटे, वय २७ वर्षे, रा. शिवापुरी, ता. आटपाडी, जि. सांगली ह.गु. महुद बु।।, ता. सांगोला, जि. सोलापूर हा होरपळल्यामुळे
गंभीर जखमी असुन त्याच्यावर सध्या पुणे येथे उपचार सुरू आहेत. याबाबत चौकशी अंती सपोनिटरी पयन मोरे, पो.स्टे. सांगोला यांनी दिलेल्या रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात
येवून सपोनिरिक्षक रविंद्र राजुलवार यांच्याकडे सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झाले कि, यातील आरोपीतांनी कट कारस्थान रचुन इंश्युरंस कंपनीचा क्लेम मिळविण्याकरिता
मौजे महुद बु।। येथील नितीन पांडुरंग नरळे याच्या मालकीच्या जागेतील गोडावून इमारतीचा रु.८०,००,०००/- रकमेचा विमा काढला होता.
तसेच त्याच जागेत एम. आर.एफ. टायर्सचे गोडावून असणारा भाडेकरू/आरोपी रामेश्वर दत्तात्रय बाड याने त्या जागेतील मालाचा रु.१,६५,००,०००/- रक्कमेचा विमा काढला होता.
त्या विम्याचा सामुहीक आर्थीक लाभ घेण्याच्या उद्देशाने मुख्य आरोपी नितीन पांडुरंग नरळे तसेच रामेश्वर दत्तात्रय बाड यांनी आरोपी नावे दिपक विठ्ठल कुटे, रा. शिवापुरी,
ता. आटपाडी, जि. सांगली तसेच अतुल आत्माराम बाड, रा. विठ्ठलापुर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली यांना आपल्या कटात घेवून
त्यांना विम्याच्या रक्कमेचे हिस्सेवाटे करून आपला व सोबतच्या सहकान्यांचा आर्थीक लाभ करण्याच्या उद्देशाने मौजे महुद बु।। येथील नितीन नरळे यांच्या मालकीच्या बिल्डींग
ज्यामध्ये रामेश्वर बाड यांचा एम. आर. एफ, टायर्सचा माल होता. त्यातील चांगले टायर्स काढून खराब टायर्सवर त्यांनी प्लास्टीक सोल्युशन तसेच पेट्रोल टाकुन आग लावून पळून जात
असतांना इझालेल्या आगीच्या भडक्यानंतरच्या स्फोटात अतुल आत्माराम बाड याची कवटी फुटुन तो जागीच मरण पावला. तरोध दिपक विठ्ठल कुटे हा होरपळून गंभीर जखमी झाला.
असा सदर घटनेचा खुलासा झाल्याने सदर गुन्हयात मुख्य सुत्रधार आरोपी म्हणुन नितीन पांडुरंग नरळे, वय ३८ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, ता. सांगोला, जि. सोलापुर हा निष्पन्न होत
असुन घटना घडल्यापासुन तो फरार आहे. त्याचा शोध घेवून त्यास अटक करून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्हा आरोपीत नामे १) नितीन पांडुरंग नरळे, वय ३८ वर्षे, रा. लक्ष्मी नगर,
ता.सांगोला, जि. सोलापूर, २) रामेश्वर दत्तात्रय बाड, वय ३४ वर्षे, रा. रा. विठ्ठलापूर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली ह.मु. गणेश टायर्स शोरूमच्या वर महुद बु।, ता, सांगोला, जि. सोलापूर: ३) अतुल आत्माराम बाड,
वय २७ वर्षे, रा. विठ्ठलापुर, दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली, ४) दिपक विठ्ठल कुटे, वय २७ वर्षे, रा. शिवापुरी, ता. आटपाडी, जि. सांगली
ह.मु. महूद बु।।, ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी कट कारस्थान रचुन विमा कंपनीची फसवणूक करून आर्थीक लाभ करण्याच्या
उद्देशाने केल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्हयात कलम १२० (ब) वैगेरे भा.दं. वि. ची वाढ करण्यात आली
सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री शिरिष सरदेशपांडे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री प्रितम यावलकर,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विकांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस
ठाण्याचे स.पो.निरी. आर.जी. राजुलवार, स.पो.निरी. मोरे तसेच सांगोला पोलीस अंमलदार यांनी केली.


0 Comments