मध्य रेल्वे सोलापूरची हद्द पूर्ववत ठेवावी सांगोला रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेत समावेश करावा :-अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७९१२)
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना
मध्य रेल्वे सोलापूरची हद्द पूर्ववत ठेवावी ,
सांगोला रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेत समावेश करावा .या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पूर्वी गुलबर्गाचे खासदार खरगे यांनी होटगी स्टेशनपासून वाडी पर्यंतचा भाग हा गुलबर्गा विभाग निर्माण करून त्यामध्ये समाविष्ट करण्याची ठरवले होते परंतु सर्वच सामाजिक संघटनांनी सदरचा निर्णयास विरोध करून पूर्ववत ठेवण्याचे पत्र दिले.
त्यामुळे भविष्यात ही मागणी जोर धरू शकते, त्यामुळे सोलापूरच्या विभागाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकते त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी या प्रश्न लक्ष देणे आवश्यक आहे.
नुकतेच रेल्वे बोर्ड दिल्ली यांनी सोलापूर रेल्वे विभागाची हद्द कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
पूर्वी वाडीपासून मनमाड स्टेशनपर्यंत सोलापूर विभागाचे हद्द होती परंतु सुधारित रचनेप्रमाणे दौंड स्टेशनसह मनमाड पर्यंतचा भाग पुणे रेल्वे विभागाला जोडलेला आहे.
परिणामी सोलापूर रेल्वे विभागातील प्रसिद्ध शिर्डी रेल्वे स्थानकासह इतर 25 रेल्वे स्थानके सोलापूर रेल्वे विभागापासून अलिप्त/ कपात होणार
असल्याचे जाहीर प्रसिद्धी करून प्रगटन दिले. शिर्डी स्थानक हे भाविकांमुळे सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारे स्टेशन असल्याने ते इतरत्र विभागात समाविष्ट झाल्यास सोलापूर रेल्वे विभागाचे उत्पन्न घटणार आहे .
एकंदरीत सर्व बाजूने उत्पन्न घटल्यामुळे रेल्वे बोर्डाकडून मिळणाऱ्या स्थानकांना भौतिक सुविधा कमी होण्याची शक्यता आहे . सोलापूर विभागातील दौंड ते मनमाड या मार्गावरील प्रवासी महसूल उत्पन्न बुडणार आहे .
एकंदरीत सोलापूर रेल्वे विभागावर याचा मोठा परिणाम होणार आहे .त्यामुळे विभाजनाचे प्रगटन रद्द होण्याची मागणी होत आहे. तरी याचा फेर निर्णय व्हावा . तसेच सांगोला रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेत समावेश करावा,
सांगोला रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटरची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना दैनंदिन समस्येला सामोरे जावे लागत आहे, एखादी एक्सप्रेस गाडी जर प्लॅटफॉर्मला आली तर आरक्षित कोणता
डब्बा, कोणत्या ठिकाणी उभा राहतो हे प्रवाशांना कोच इंडिकेटर अभावी समजत नसल्याने अडचणी येत आहेत. तरी रेल्वे प्रशासनाने सांगोला स्टेशनवर कोचिंग इंडिकेटरची उभारणी करावी अशी प्रवासी वर्गातून मागणी जोर धरत आहे.
या निवेदनाची प्रत
रावसाहेब दानवे ,रेल्वे राज्यमंत्री, महाव्यवस्थापक, रेल्वे मुंबई,खासदार. रणजितसिंह नाईक- निंबाळकर,विभागीय रेल्वे व्यवस्थापक ,सोलापूर यांनाही देण्यात आले अशी माहिती शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आली.


0 Comments