ब्रेकिंग न्यूज..मनोज जरांगे पाटलांनी टाकला नवा डाव, वैरागच्या सभेत मोठी घोषणा
प्रत्येक गावातून दोन उमेदवार; लोकसभेला करणार धमाका, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अद्यापही सगे-सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केलं.
मात्र आम्हाला ते आरक्षण नको तर ओबीसीमधून आरक्षण द्या, सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे.
आज मनोज जरांगे पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी वैरागमध्ये आयोजित सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे, आपण आरक्षणाचा लढा जिंकला आहे. 63 लाख कुणबी दाखले सापडले आहेत, त्यातून जवळपास सव्वा कोटींच्या आसपास मराठा बांधवांना आरक्षण मिळालं आहे.
आता सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली की राहिलेल्या समाजाला देखील आरक्षण मिळेल. आता इथून पुढे उपोषण करणार नाही, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजानं जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरावेत असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, मराठा मतदारसंघात जास्त उमेदवार झाले तर चिन्ह कसे आणणार?
काही पोरं तर म्हणतात आम्ही काहीही विकू पण समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करा, त्यामुळे सांगतो आमच्या नादाला लागू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहान देखील केलं आहे. शरीरानं फक्त साथ द्यावी,
आता इथून पुढे उपोषण करणार नाही, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं हटणार नाही. मला राजकारण करायचं नाही,
ओबीसीतून आरक्षण द्या हे मराठे तुम्हाला घेऊन नाचतील. आपल्याला एकत्र यायंच आहे, चार कोटी लोक एकत्र येऊन सरकारला पाणी पाजायचं आहे. मी तुमचा लढा लढत आहे,
शब्द देतो शेवटपर्यंत गद्दारी करणार नाही. मुलगा म्हणून तुरुंगात बसेल पण ओबीसीतून आरक्षण घेईल, साथ द्या, असं भावनिक आवाहनही यावेळी जरांगे पाटील यांनी केलं आहे.


0 Comments