google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निर्घृण खून... मृत्यूपूर्वी तडफडताना पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांचं कांड; गळ्यात ठोकला खिळा, घटनेने खळबळ

Breaking News

निर्घृण खून... मृत्यूपूर्वी तडफडताना पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांचं कांड; गळ्यात ठोकला खिळा, घटनेने खळबळ

 निर्घृण खून... मृत्यूपूर्वी तडफडताना पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांचं कांड; गळ्यात ठोकला खिळा, घटनेने खळबळ


एखाद्याला तडफडून मरताना बघून त्याचा आसुरी आनंद घेणाऱ्यांविषयी तुम्ही कधी ऐकलंय का? एखाद्या गोष्टीचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने खून केला असेल तर त्यामागे त्यांचा हेतू असतो. 

त्याचंही समर्थन करता येत नाहीच; पण फक्त आनंद घेण्यासाठी एका निष्पाप अनोळखी ड्रायव्हरचा खून शाळकरी मुलांनी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 ही घटना बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूरमध्ये घडली आहे. ही तिन्ही मुलं अल्पवयीन असून त्यांनी पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे. 

सोशल मीडियावर अशा प्रकारच्या हत्येची पद्धत पाहिली होती आणि एखाद्याला मरताना तडफडताना पाहण्यासाठी या मुलांनी हे कृत्य केलंय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तीन अल्पवयीन मुलं 8 वी, 9 वी आणि 11 व्या इयत्तेत शिकतात. त्यापैकी एकाने बहिणीच्या पाठवणीच्या बहाण्याने मंगळवारी (13 फेब्रुवारी) रात्री एसयूव्ही कार बुक केली होती. 

यानंतर तयार झाल्यानंतर तिघे मित्र गाडीत बसून निघून गेले. त्यानंतर वाटेत तिघेही गाडी थांबवून खाली उतरले आणि त्यांनी ड्रायव्हरचा निर्घृण खून केला.

तीन मुलांपैकी एका मुलाने ड्रायव्हरच्या गळ्यात फास घातला होता. त्यानंतर दुसऱ्याने ड्रायव्हरच्या गळ्यात खिळा मारला. यानंतर चालकाचा गळा दोरीने घट्ट बांधून त्याचा मृत्यू होईस्तोवर ते आवळत राहिले. 

ड्रायव्हर मरत असताना हे तिघेही जोरजोरात हसत होते, असंही त्यांनीच पोलिसांना सांगितलं.

Post a Comment

0 Comments