खळबळजनक ...आधी दोन कारला धडक;
मग जाणूनबुजून बाईकस्वाराला चिरडले
राज्यात अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. अनेकदा या अपघातांचे व्हिडिओही समोर येतात. काही वेळा या घटना इतक्या विचित्र असतात की, त्यांचे व्हिडिओ समोर येताच व्हायरल होतात.
सध्या विरारमधील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल. कारण,
समोर बाईकस्वार दिसत असतानाही कार चालक मुद्दाम त्याला चिरडून तिथून फरार झाला. अर्नाळा गावातील जांभूळ पाडा रोडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कार रस्त्याच्या मधोमध दुसऱ्या कारला धडकताना दिसत आहे. घटनेच्यावेळी रस्त्यावर उपस्थित असलेले लोक आक्रमक कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
मात्र कार चालक गाडी थांबवण्याऐवजी गाडीला धडकून घटनास्थळावरून फरार झाला आहे. कार चालकाने रस्त्यावर आधी पहिल्या कारला धडक दिली.
यानंतर तिथून फरार होण्याच्या नादात तो दुसऱ्या कारला धडकला. रस्त्यावर दुसऱ्या कारला या गाडीने धडक दिली. तेव्हा समोरून एक बाईकस्वार आला आणि कारला थांबवण्याचा प्रयत्न त्याने केला.
मात्र, यानंतर कार चालकाने जे काही केले, ते अतिशय धक्कादायक होते. कार चालकाने बाईकस्वाराला चिरडून घटनास्थळावरून पळ काढला.


0 Comments