सांगोला तालुक्यातुन कत्तलखान्याकडे घेवून जाताना पोलिसांनी १८ हजार ८०० रुपये किमतीची ४७ जर्शी गायीची खोंडे, २ लाख २५ हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो पकडला ; जनावरांची सुटका
(शब्दरेखा एक्सप्रेस संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- आयशर टेम्पोत ४७ जर्सी गायची खोंडे क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने भरून, निर्दयीपणे दोरीने बांधून त्यांना कत्तलखान्यात घेवून जाताना
पोलिसांनी पकडून जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार ८०० रुपये किमतीची ४७ जीं गायीची खोंडे,
२ लाख २५ हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला. याप्रकरणी पो.कॉ. निशांत साबजी यांनी अरीफ शेख रा. शिरभावी यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,
पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना अरीफ शेख हा इसम आयशर टेम्पोतून गोवंशाची कत्तलखान्यात विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने
त्यांनी स.पो.नि खरात, म.पो.स.ई उबाळे, पो.हे.कॉ. घोडसे, पो.हे.कॉ. क्षिरसागर, पो.हे.कॉ. कोरे, पो.कॉ. पांढरे, पो.कॉ. निशांत सावजी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिस माहितीच्या ठिकाणी गेले असता त्यांना संशयित आयशर टेम्पों उभा होता. पोलिसांना पाहताच टेम्पो जवळ थांबलेल्या काही व्यक्ती पळून गेल्या. दरम्यान, पोलिसांनी आयशर
टेम्पोत ४७ जशी गाईची खोंडे क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने कोंबून त्यांना वेदना होईल अशा परिस्थीतीत निर्देवीपणे भरलेले दिसून आले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरची जनावरे कत्तलीसाठी घेवून जात असल्याची खात्री झाली. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार ८०० रुपये किमतीची ४७ जर्शी गायीची खोंडे,
२ लाख २५ हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला. याप्रकरणी पो.कॉ. निशांत सावजी यांनी अरीफ शेख यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


0 Comments