google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.दत्तात्रय काळेल यांचा सत्कार संपन्न

Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.दत्तात्रय काळेल यांचा सत्कार संपन्न

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या


संशोधक मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.दत्तात्रय काळेल यांचा सत्कार संपन्न     
    

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी): पंढरपूर येथे जया एकादशीच्या निमित्ताने लोणारी समाज मठाचे अध्यक्ष मा.भाऊसाहेब गोडसे व आमदार रवी भाऊ  धंगेकर

 विचार मंचचे सदस्य मा.वाल्मिकी झाडगे व वारकरी संप्रदाय भक्तगण यांच्यावतीने प्रा. डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांची पुण्यश्लोक 

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना  पीएच.डी करण्यासाठी  संशोधक मार्गदर्शक म्हणून नुकतीच निवड केली आहे.

 तसेच राज्यस्तरीय अनेक शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल  पुरस्कारही मिळालेले आहे.त्याबद्दल लोणारी समाज मठामध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी डॉ. काळेल यांनी आपल्या मनोगतामध्ये अफार कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते

 .त्यासाठी खडतर परिश्रम करण्याची गरज आहे असे सांगितले व यशाचे गमक त्यांनी चांगल्या विचाराच्या लोकांबरोबर संगत केली तरच शक्य आहे असे सांगितले.

 याप्रसंगी कोल्हापूरचे कॉन्ट्रॅक्टर देसाई साहेब व मठाचे व्यवस्थापक रामचंद्र खांडेकर व वारकरी संप्रदाय मधील महाराष्ट्रातून आलेले स्त्री पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments