सांगोला -आण्णाभाऊ साठे उद्यानाचे समोर एस.टी बसला पाठीमागुन धडक; एकाचा मृत्यू
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- बसला पाठीमागुन धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असल्याची घटना सांगोला येथील आण्णाभाऊ साठे उद्यानाचे समोर घडली.
अपघातामध्ये हनुमान मुळे रा. जुजगव्हाण ता.जि. बीड यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची फिर्याद पोहेकॉ दत्ता वजाळे यांनी दिली आहे.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी रात्रौ ०१/५० वा. चे सुमारास चालक अंकुश गायकवाड हे सोलापुर आगारची बस घेवुन सोलापुर ते कोल्हापुर निघाले होते. सांगोला येथील भिमनगर चौकाचे अलीकडील
पहिला स्पीड ब्रेकर पास करून लागलीच दुसरा असणारा स्पीड ब्रेकर पास करीत असताना पाठीमागुन मोटार सायकल ही भरधाव वेगात,
हयगयीने अविचाराने चालवुन पाठीमागुन धडक दिल्याने त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारास दाखल केले असता तो उपचारापुर्वीच पहाटे ०३.२० वा. सुमारास मयत झाला आहे.
फिर्यादी यांनी मोटार सायकल चालकाविरुध्द आपले ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने हयगयीने, अविचाराने चालवून बसला
पाठीमागे धडक देवुन त्यात गंभीर जखमी होवुन स्वतःचे मरणास कारणीभुत झाला म्हणून मोटार सायकल चालकाचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे.


0 Comments