google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक... बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट'दंगल' फेम अभिनेत्रीचे निधन

Breaking News

धक्कादायक... बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट'दंगल' फेम अभिनेत्रीचे निधन

धक्कादायक... बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट'दंगल' फेम अभिनेत्रीचे निधन


बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट ‘दंगल’मधील अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झाले आहे. 

सुहानीने वयाच्या 19 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुहानीचा मोठा अपघात झाला होता, त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता.

 सुहानीने उपचारासाठी घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम झाले आणि तिच्या शरीरात हळूहळू पाणी साचले. तिच्या मृत्यूचे कारण संपूर्ण शरीरात पाणी भरल्याने असल्याचे सांगितले जात आहे. 

तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुहानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार होती.

 तिने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सुहानीने ज्युनियर बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. 

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले होते. 

या चित्रपटानंतर सुहानीला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ऑफर्स आल्या होत्या, पण शिक्षणामुळे तिने चित्रपटांपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

Post a Comment

0 Comments