google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयंकर घटना...तो बायकोचं मुंडकं हातात घेऊन तासभर रस्त्यावर फिरत होता, घरी 2 लेकरं वाट पाहत होती!

Breaking News

भयंकर घटना...तो बायकोचं मुंडकं हातात घेऊन तासभर रस्त्यावर फिरत होता, घरी 2 लेकरं वाट पाहत होती!

भयंकर घटना...तो बायकोचं मुंडकं हातात घेऊन तासभर रस्त्यावर फिरत होता, घरी 2 लेकरं वाट पाहत होती!


दिवसेंदिवस माणसामधील संवेदनशीलता नष्ट होत आहे, ही बाब उत्तर प्रदेशातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. 

उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी फुलराणीचा निर्घृण खून केला. त्यानंतर धडापासून तिचं मुंडकं वेगळं केलं

 आणि ते हातात घेऊन रस्त्यावर फिरला. आपल्या पत्नीचे कोणाशीतरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे.

 गवंडी म्हणून काम करणाऱ्या अनिलला पत्नीच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बसरा गावात ही घटना घडली.

आरोपी अनिल एक तासाहून अधिक काळ पत्नीचं छिन्नविछिन्न मुंडकं हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन

 पीडित महिला फुलराणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी पतीला अटक केली. त्यानंतर पीडित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली. तीन वर्षांपूर्वी त्याने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली होती. त्या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिलचे आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला दोन मुलं आहेत. आरोपी आणि त्याची पत्नी गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments