दुर्दैवी घटना!मंगळवेढा या मार्गावर साडीचा पदर मोटर सायकलच्या चाकात अडकून पडल्याने महिलेचा झाला मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे ते मंगळवेढा या मार्गावर मोटर सायकलवर बसून निघालेल्या एका ६० वर्षीय महिलेच्या साडीचा पदर
मोटर सायकलच्या चाकात अडकून खाली पडल्याने गंभीर जखमी होवून ती मयत झाली असून छबाबाई बलभिम लेंडवे असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत छबाबाई लेंडवे (वय ६० रा. लेंडवे चिंचाळे) ही मयत महिला दि.१७ जानेवारी
रोजी ५.३० वाजता लेंडवे चिंचाळे हून मंगळवेढ्याकडे येत असताना बलभिम लेंडवे यांचे सोबत मोटर सायकलवर पाठीमागे बसून जात असताना
सदर महिलेचा साडीचा पदर मोटर सायकल मध्ये अडकून खाली पडून डोकीस मार लागल्याने मयताचा भाऊ संभाजी इंगवले यांनी उपचारासाठी मिरज येथे दाखल केले होते.
मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शून्य क्रमांकाने मिरज पोलीसांकडून मंगळवेढा पोलीस ठाण्यात ही अपघाताची घटना नोंद झाली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार साळुंखे हे करीत आहेत.


0 Comments