कृषी सहाय्यक समाधान गवळी उल्लेखनीय गुणवत्तापूर्ण
कार्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सांगोला प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या विभागातून उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
याही वर्षी तालुका कृषी कार्यालय सांगोला अंतर्गत कार्यरत असलेले कृषी सहाय्यक, समाधान गवळी यांना कृषी विभागांतर्गत गुणवत्तापूर्ण
व उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावचे सुपुत्र असलेले समाधान गवळी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी अंतर्गत एमएससी ऍग्री
पदवी पूर्ण करून २०१४ साली शासकीय सेवेत रुजू झाले.त्यांनी कोकणातील रायगड येथे काही काळ काम केले आहे .
सध्या सांगोला तालुक्यातील चोपडी, बंडगरवाडी व पाचेगाव बु या कार्यक्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत.चालू आर्थिक वर्षांमध्ये कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची यामध्ये मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना,
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना,प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत
बियाणे वितरण या सर्व योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याची दखल घेऊन शासनाकडून उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी ,जुनोनी मंडल कृषी अधिकारी
,कृषी पर्यवेक्षक यांचे , वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. कृषीमित्र बाळासाहेब बाबर यांची साथ व शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे हे उद्दिष्ट व यश साध्य करता आले. अशी प्रतिक्रिया कृषी सहाय्यक समाधान गवळी यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
0 Comments