google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..१२ हजार ५०० फुटांवर ७५ तिरंग्याचं तोरण फडकवुन साजरा केला प्रजासत्ताक दिवस सांगोल्याचे गिर्यारोहक वैभव ऐवळे यांची ऐतिहासिक कामगिरी

Breaking News

मोठी बातमी..१२ हजार ५०० फुटांवर ७५ तिरंग्याचं तोरण फडकवुन साजरा केला प्रजासत्ताक दिवस सांगोल्याचे गिर्यारोहक वैभव ऐवळे यांची ऐतिहासिक कामगिरी

मोठी बातमी..१२ हजार ५०० फुटांवर ७५ तिरंग्याचं तोरण फडकवुन साजरा केला


प्रजासत्ताक दिवस सांगोल्याचे गिर्यारोहक वैभव ऐवळे यांची ऐतिहासिक कामगिरी

सांगोला लाईव्ह: २६ जानेवारी रोजी अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील गिर्यारोहक वैभव ऐवळे व 

त्यांच्या टीमने उत्तराखंड मधील केदारकंठा या १२५०० फूट उंचीच्या शिखरावर ७५ तिरंग्याचं तोरण फडकावत प्रजासत्ताक दिवस साजरा केला.

 उणे १२ डीग्री तापमान आणि ताशी ७/८ किमी वेगाने वाहणारे वारे, बोचरी  थंडी अशा वातावरणात वैभव ऐवळे (वाढेगांव, सांगोला), बाळकृष्ण जाधव (सोलापूर), निखिल यादव (सोलापूर), सुमित नाईकधुरे (मुंबई) यांनी ही कामगिरी केली.

 वैभव पांडुरंग ऐवळे हे मूळचे सांगोला तालुक्यातील वाढेगावचे आहेत.गेली २ दशके सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात भटकंती करत आहे. आजवर २०० पेक्षा जास्त किल्ले सर केले आहेत. तसेच , अनेक घाटवाटा, जंगल ट्रेक, रेंज ट्रेक आणि सुळके सर केले आहेत.

त्यांनी आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वोच्च शिखरे माउंट किलीमांजारो १५.०८.२०१८ (५८९५ मी.) आणि माउंट एलब्रूस १५.०८.२०१९ (५६४२ मी.) सर करून अनुक्रमे

 ७२ आणि ७३ भारतीय ध्वजांचं ध्वज-तोरण फडकावत ७२ आणि ७३ वा स्वतंत्रता दिवस साजरा केला होता. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

Post a Comment

0 Comments