google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयानक अपघात...पंढरपूर - करकंब रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर --

Breaking News

भयानक अपघात...पंढरपूर - करकंब रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर --

 भयानक अपघात...पंढरपूर - करकंब रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर --


 पंढरपूर  करकंब रस्त्यावर पुन्हा एक अपघात झाला असून, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते. ऊस तोडणी कामगारांना घेवून एक पिकअप वाहन, पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. 

अपघाताच्या घटना वरचेवर वाढत असून हा एक चिंतेचा विषय बनला आहे. रस्ते रुंद होऊनही हे अपघात वाढले आहेत. सिमेंटचे रस्ते झाल्यापासून वेगावर कसलेच नियंत्रण उरले 

नसून रोज अनेक निरपराध लोकांचे जीव जात आहेत तरीही कुणालाच याची परवा असल्याचे दिसत नाही. प्रत्येकाला फक्त घाई आहे आणि आपलाच वेळ सगळ्यात महत्वाचा आहे,

 मग त्यासाठी कुणाचे जीव गेले तरी चालतील अशा पद्धतीने वाहने चालवली जात आहेत. पंढरपूर करकंब रस्त्यावर या आधीही काही गंभीर अपघात झालेले आहेत आणि आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. 

काही वेळेपूर्वी अपघाताची ही घटना घडली असून या ठिकाणी काळीज भेदणारा आक्रोश ऐकू येत होता. हा प्रसंग पाहणाऱ्याचा अंगावर काटा उभा राहत होता.  

भरधाव वेगाने निघालेले हे वाहन अचानक पलटी झाले आणि या वाहनाने सलग तीन पलट्या  मारल्या. आत्ता काही वेळापूर्वीच खेड पाटीच्या जवळ अपघाताची ही घटना घडली आहे. 

पिक अप वाहनाने सलग तीन पलट्या मारल्यामुळे या वाहनात बसलेल्या उस तोडणी कामगारांना जबर मार लागला आहे. 

अपघात होताच खेड भोसे येथील बंडू पवार तसेच अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवून दिले.

 या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने सांगण्यात येत असून तीन चार वर्षांच्या लहान मुलांसह, अन्य महिला आणी पुरुष देखील जखमी झाले आहेत. 

अपघात होताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिकअप वाहनाने अचानक कशा पलट्या घेतल्या, हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. अपघाता नंतर मात्र या ठिकाणी फक्त आकांत आणि आक्रोश ऐकायला मिळत होता.

Post a Comment

0 Comments