धक्कादायक प्रकार...पंढरपूर कोंढारकी गावामध्ये महिलांची फसवणूक;
लकी ड्रॉ चे तिकीट म्हणून गावातील आठ ते दहा महिलांना फसवली.जवळपास 20 हजाराचा फटका
पंढरपूर मधील कोंढारकी गावामध्ये महिलांबरोबर काही लोकांनी स्कॅम केला. 19 जानेवारी 2024 रोजी दुपारी बाराच्या सुमारास एक पुरुष आणि चार महिला गावामध्ये आले होते.
त्यांनी गावांमध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन लकी ड्रॉ ऑफर आहे असे त्यांनी सांगितले. आणि आपल्या गोड बोलण्याने त्यांनी महिलांना फसवले.
फसवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत…
महिलांचे फसवणूक करण्यासाठी आलेल्या महिलांनी स्त्रियांना एक एक लकी ड्रॉ चे तिकीट म्हणून दिले त्यांनी सांगितले की हे लकी ड्रॉ चे तिकीट तुम्ही शंभर रुपये देऊन आमच्याकडून घ्या, त्या लकी ड्रॉवर काही वस्तू होत्या.
आणि त्याच्यावर एक स्केच कार्ड सुद्धा होते त्यांनी सांगितले की हे स्क्रॅच कार्ड स्क्रॅच केल्यावर याच्यात जी कोणती वस्तू लिहिलेली असेल ती तुम्हाला फक्त 2800 रुपये भरून मिळेल. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितले
या 2800 रुपये भरून घेतलेल्या वस्तू बरोबर तुम्हाला हवे असेल ते गिफ्ट देण्यात येईल त्या गिफ्ट मध्ये एलईडी टीव्ही, शिलाई मशीन, फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, आणि मोबाईल एवढ्या वस्तू होत्या.
आपल्याला विश्वास बसण्यासाठी 2800 रुपये भरल्यावर ते आपल्याला एक वस्तूही देतात नंतर फ्री मध्ये मिळणारी वस्तू मात्र ते चार वाजता येऊन देतो असे बोलून ते नंतर येतच नाही.
त्यानंतर त्या फसवणाऱ्या स्त्रियांनी महिलांना सांगितले की जर तुम्ही एक तिकीट घेऊन आणखीन एक तिकीट घेतले तर तुम्हाला 2800 रुपये भरून मिळालेल्या वस्तूबरोबर फ्री गिफ्ट च्या जागी हवा
असल्यास 15000 रुपये कॅश देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आणि काही शब्द गोड बोलून त्यांनी गावातील आठ ते दहा महिलांना फसवली.
या फसव्या लोकांपासून वाचण्याचा उपाय…
ही घटना तुमच्याबरोबर ही होऊ शकते त्यामुळे तुम्ही सावधान व्हा. त्या फसवणाऱ्या महिलांनी जे कुपन तिकीट दिले होते
त्याच्यावर मेघना इंटरप्राईजेस असे नाव आहे. आणि ते तुम्हाला त्यांचे हेड ऑफिस विचारल्यास जाधव मंगल कार्यालय शेजारी आंबेवाडी कोल्हापूर असा पत्ता ही सांगतील.
आणि आपल्याला विश्वास बसावा त्यामुळे ते आपल्यासमोर त्यांच्याच एका साथीदाराला फोन लावतात आणि एका कस्टमरने वस्तू घेतली आहे
असे सांगून आपल्याबरोबर थोडे बोलायला देतात आणि आपण त्यांना बोलतो आणि तेही गोड बोलून आपल्याला फसवत. जर असं कोणी तुमच्याकडे ऑफर घेऊन आलं तर तुम्ही त्या ऑफरला बळी पडून फसू नका.


0 Comments