सांगोला येथे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी): अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगोला शहर शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य 350 फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
ही तिरंगा पदयात्रा मंगळवार दि. २३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता सांगोला कॉलेज सांगोला येथून सुरू होऊन पुढे कडलास नाका - वासुद चौक - महात्मा फुले चौक -
छत्रपती शिवाजी महाराज चौक - जय भवानी चौक - वाढेगाव नाका - सांगोला कॉलेज सांगोला येथे समाप्त होईल.
तरी सर्व विद्यार्थी व नागरिकांनी या तिरंगा पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगोला शहर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments