google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसामुळे तरुणांमध्ये उर्जा निर्माण झाली

Breaking News

डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसामुळे तरुणांमध्ये उर्जा निर्माण झाली

 डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसामुळे  तरुणांमध्ये उर्जा निर्माण झाली


  शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांचा वाढदिवस 

सांगोला विधानसभा मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. स्व.आबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत.डाॅ.बाबासाहेब यांनी समाजकार्याची वाटचाल सुरू ठेवली आहे.

विविध गावांमध्ये अनेक सामाजीक उपक्रमाच्या माध्यमातून विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतुने अनेक उपक्रम राबविले गेले.लाखो रुपये रोख बक्षिसे व आबासाहेब केसरीचा बहुमान देऊन 

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा मालकांनी आपल्या बैलगाडी सह सहभाग नोंदविला होता.

बैलगाडी शर्यती दरम्यान अनेक राज्यांतील व जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.बाबासाहेब देशमुख यांच्या वरती प्रेम करणाऱ्या न गरीकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.

  सदर कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील,

माजी  पालकमंत्री दत्तात्रय भरणे,मा.आ राजन पाटील,आ.यशवंत माने,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,मा.ब्रम्हानंद पडळकर, 

धैर्यशिल मोहिते पाटील,अभिजीत पाटील,प्रणव परीचारक, भाऊसाहेब रुपनर यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या कार्याची प्रशंसा करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

  सांगोला विधानसभा मतदारसंघात अनेक गावांत डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व  कार्यकर्त्यांनी केले होते.

आरोग्यशिबीरे, रक्तदान शिबीरे, वंध्यत्व निवारण शिबीरे आशा उपक्रमाच्या बरोबरीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.काही गावांमध्ये आजुन नियोजीत कार्यक्रम आहेतच..

  गावोगावच्या युवा कार्यकर्त्यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील 

युवा वर्ग डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांना आपला  आयकाॅन समजु लागले आहेत.. त्यांच्या साध्य राहणीमानाची व उच्च विचारसरणीची भुरण तरुणवर्गाला पडलेली पाहावयास मिळताना दिसत आहे. 

बाबासाहेबांचा तरुण वर्गाशी व जेष्ठांशी असलेल्या जनसंपर्कामुळे संपूर्ण नागरीकांमध्ये त्यांच्या बदल एक आपला माणुस अशी भावना तयार झालेली आहे‌.लोकांना स्व आबासाहेबांची छबी बाबासाहेबामध्ये दिसत आहे.

आशा अनेक कारणांमुळे डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण युवा वर्गामध्ये उत्साह निर्माण झालेला पाहावयास मिळत आसलेचे पहावयास मिळताना दिसत आहे.

डाॅ भाई  बाबासाहेब देशमुख‌ यांचा वाढदिवस तरुणांसाठी उर्जा निर्माण करणारा ठरला असल्याचे मत शेकापक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी

Post a Comment

0 Comments