मोठी बातमी...१२५०० फुटांवर साजरा होणार जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा अमृतमहोत्सव सोहळा
२६ जानेवारी भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक तारीख. यंदा, २६ जानेवारी रोजी अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून
महाराष्ट्रातील गिर्यारोहक उत्तराखंड मधील केदारकंठा या १२५०० फूट उंचीच्या शिखरावर ७५ तिरंग्याचं तोरण फडकवुन प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहेत.
टीम मध्ये वैभव ऐवळे (वाढेगावं, सांगोला), बाळकृष्ण जाधव (सोलापूर), निखिल यादव (सोलापूर), सुमित नाईकधुरे (मुंबई) यांचा समावेश आहे.
२०२४ मध्ये भारत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे.
Bharat- The Mother Of Democracy ही यंदाच्या गणतंत्र दिवसाची थीम आहे.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा इतिहास
देशातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेला धरून देशाला गव्हर्न आणि मार्गदर्शन करणारे जगातील सर्वांत मोठ संविधान हे भारताचे आहे.
ज्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत संविधान कमिटीने काम केले.
ज्यामध्ये अल्लादि कृष्णस्वामी अय्यर, के एम मूनशी, देबी प्रसाद खैतन, सर सय्यद मोहमद सादिल्ला, एन गोपलास्वामी अय्यंगार, बी एल मिटर यांचा समावेश होता.
१६६ दिवसांनंतर २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान पूर्ण झाले पण २६ जानेवारी १९५० ला ते अमलात आणले
कारण २६ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस होता. १९३० मध्ये याच दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांना पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती
आणि तो दिवस स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जात असे. त्याच दिवशी संविधान अमलात आणून तो देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो.
सोहळ्याची तयारी-
यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा अमृतमहोत्सव असल्याने या सर्व देशभक्ताना ट्रिब्युट म्हणून सदर मोहीम या गिर्यारोहकानी आखली आहे.
शिखरमाथ्यावर ७५ भारतीय तिरंग्याचे तोरण फडकवून आणि भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा टीमचा मानस आहे.


0 Comments