खळबळजनक घटना...रात्री घोरत होता पती, पत्नीला आला राग, एम्ब्रॉयडरी कटरने कायमचं केलं शांत
पती-पत्नीचं नातं अत्यंत वेगळ्या प्रकारचं असतं. या नात्यात वेळोवेळी भांडणं होतात आणि ती विसरून ती दोघं पुन्हा एकत्रही येतात. सत्यवान-सावित्रीची पुराणातली कथा तर सर्वज्ञातच आहे.
अलीकडच्या काळात मात्र पती-पत्नी एकमेकांच्या जिवावरही उठल्याची काही उदाहरणं पाहायला मिळतात. लुधियानात अशीच एक दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. किरकोळ घरगुती भांडणानंतर एका महिलेने आपल्या पतीला चक्क ठार केलं.
लुधियानातल्या नूरवाला रोड परिसरातल्या एका महिलेने घरगुती भांडणाच्या रागातून आपल्या पतीला ठार केलं. किरकोळ गोष्टीवरून त्या दोघांच्यात बोलाचाली झाली होती.
त्यानंतर पती झोपी गेला आणि घोरू लागला. पत्नीच्या डोक्यात मात्र रागाने घर केलेलं होतं. तिने झोपलेल्या पतीच्या गळ्यावर एम्ब्रॉयडरी कटरने वार केला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बस्ती जोधेवाल पोलीस ठाण्यातले अधिकारी घटनास्थळी गेले. त्यांनी मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टेमला पाठवला. त्या व्यक्तीचं नाव गौरव असं आहे.
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केल्याचंही समजतं; मात्र अद्याप पोलिसांनी याबद्दल अधिक काही स्पष्ट केलेलं नाही. कटर लागल्यामुळे गौरवचा मृत्यू झाला आहे, एवढंच पोलिसांनी सांगितलं आहे.
एंब्रॉयडरीचं काम करणाऱ्या गौरवचा विवाह सोनम नावाच्या महिलेशी झाला होता. त्या दोघांना 11 वर्षांचा मुलगाही आहे.
घरगुती बाबींवरून त्या दोघांच्यात कायमच भांडणं व्हायची. सोमवारी रात्री (22 जानेवारी) पुन्हा एकदा त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर गौरव झोपी गेला.
गौरव घोरत होता. त्यावरून पत्नी सोनम चिडली आणि तिने कटकट सुरू केली. त्यावरून दोघांमध्ये मारझोड सुरू झाली.
तेवढ्यात सोनमने तिथे पडलेला कटर उचलला आणि थेट गौरवच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.


0 Comments