google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील गणेशरत्न कृषी प्रदर्शनाची सांगता हजारो शेतकऱ्यांनी घेतला लाभ डॉ. अनिकेत देशमुख यांचे कृषी प्रदर्शन भरविल्यामुळे सर्वत्र कौतुक

Breaking News

सांगोल्यातील गणेशरत्न कृषी प्रदर्शनाची सांगता हजारो शेतकऱ्यांनी घेतला लाभ डॉ. अनिकेत देशमुख यांचे कृषी प्रदर्शन भरविल्यामुळे सर्वत्र कौतुक

 सांगोल्यातील गणेशरत्न कृषी प्रदर्शनाची सांगता हजारो शेतकऱ्यांनी घेतला लाभ


डॉ. अनिकेत देशमुख यांचे कृषी प्रदर्शन भरविल्यामुळे सर्वत्र कौतुक

सांगोला येथे चार दिवसांपासून सुरू असलेल्या डॉ. अनिकेत देशमुख यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय गणेशरत्न कृषी प्रदर्शनाची सोमवारी सांगता झाली. प्रदर्शनादरम्यान सहकार्य करणाऱ्या सर्वांचा गौरव करण्यात आला. 

स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाची सांगता झाली.

या कृषी प्रदर्शनात ट्रॅक्टरची खरेदी केल्यानंतर डॉ. अनिकेत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

गणेशरत्न प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना शेतीतील नवे प्रयोग आणि नव्या तंत्राची ओळख झाली. जिल्ह्यातील पहिलाच कृषी प्रदर्शन ठरला आहे 

की, ज्याकृषी प्रदर्शनाला हजारोच्या संख्येने शेतकरी नागरिक हे उपस्थित राहिले. चार दिवसात हजारो शेतकरी आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

शेती, खते, बियाणे, दुग्ध व्यवसाय, शेती अवजारे, जलसिंचनाच्या पद्धती आदी विषयक माहितींचा खजिना शेतकऱ्यांनाउपयुक्त ठरला. प्रदर्शनातील विविध कंपन्याच्या स्टॉल्सभोवती शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत गर्दी केली होती. 

या कृषी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट, गृहउद्योग, विद्यार्थ्याने अनेक शेती उपयोगी साहित्य अशा वेगवेगळ्या संस्था देखील या प्रदर्शनात

 सहभागी झाल्या होत्या. यावेळी डॉ. अनिकेतदेशमुख म्हणाले, स्व. आबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या जीवावर ५५ वर्षे तालुक्याचे विधानसभेत नेतृत्व केले. 

त्यांच्या स्मरणार्थ कृषी प्रदर्शन राबविले आणि ते यशस्वी झाले याचा खूप आनंद झाला आहे. या प्रदर्शनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

शेतकऱ्यांना गणेशरत्न कृषी प्रदर्शनामुळे नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याचे सांगत कृषीप्रदर्शन आयोजित

 केल्याबद्दल डॉ. अनिकेत देशमुख यांचे कौतुक केले. यावेळी बजरंग चौगुले, रवी कांबळे, प्राचार्य अरविंद येलपले, लक्ष्मीदहिवडीचे पाटील, स्टॉलचालक सोमनाथ खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले.

 सूत्रसंचालन हणमंत कोळवले, प्रा. बाळकृष्ण कोकरे यांनी तर आभार अमोल खरात व डॉ. दादा जगताप यांनी मानले. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.


चौकट

नागरिकांसह शेतकरी भारावले

चार दिवस चाललेल्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांसह नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. 

सांगोला तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले हे प्रदर्शन पाहून नागरिक आणि शेतकरी भारावले गेले असून डॉ. अनिकेत देशमुख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे 

व स्व. आबासाहेबांच्या सामाजिक कार्याचा वसा डॉ. अनिकेत देशमुखच आपल्या सामाजिक कार्यातून पुढे घेऊन जातील व सर्वापुढे एक आदर्श निर्माण करतील, असाही विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात होता.

Post a Comment

0 Comments