google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवावर कुऱ्हाडीने सपासप वार

Breaking News

धक्कादायक प्रकार...सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवावर कुऱ्हाडीने सपासप वार

 धक्कादायक प्रकार...सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवावर कुऱ्हाडीने सपासप वार


अलीकडच्या काळात नात्यामध्ये दुरावा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी किरकोळ कारणातून टोकाचे वाद निर्माण होत आहे. हा वाद कधीकधी थेट जीवे मारण्यापर्यंत पोहचत आहे.

 अशीच एका घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात सासऱ्याने आपल्या गर्भवती सून आणि नातवाची हत्या केली आहे.

 क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला गेल्याने हे हत्यांकांड घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली आहे. नारायण गायकी (वय 65 वर्षे) असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. तर अश्विनी गायकी आणि समर्थ गायकी (8 वर्षे) अशी मृत मायलेकाची नावे आहेत.

 क्षुल्लक कारणातून वाद झाल्याने सासरा नारायण गायकी याने सून अश्विनी आणि नातू समर्थ यांची हत्या केली. धक्कादायक म्हणजे अश्विनी ह्या गर्भवती होत्या. हे सर्व माहित असताना सासरा नारायण गायकीने दोघांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

यात 8 वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली. अश्विनीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. 

मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे. 

हत्येनंतर स्वतः पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments