सांगोला मौजे बामणी येथे माजी उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून मालमत्ता क्र ४८ चे वाढीव
क्षेत्र लावल्याने त्यांची चौकशी व्हावी अन्यथा दि.२६ जाने. रोजी आमरण उपोषण करणार.. मा.प्रभाकर तातोबा बिचुकले
सांगोला (प्रतिनिधी):- तत्कालीन ग्रामसेवक बामणी यांनी मालमत्ता हस्तांतरणाचा कायदा १८८२ नुसार कोणताही रजिस्टर दस्त नसताना वाढीव क्षेत्र कर आकारणी यादीमध्ये समाविष्ट केले याची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी
सांगोला :- मौजे बामणी ता. सांगोला जि. सोलापूर येथील मालमत्ता क्रमांक ४८ क्षेत्र १५०० चौ. फुट ही मिळकत दिगंबर सोपान इंगोले यांनी दिनांक २२/०२/२००२ रोजी वसंत कृष्णाजी कुलकर्णी यांचे
कडून रजिस्टर दस्त क्रमांक ७३५/२००२ अन्वये खरेदी केलेली मिळकत आहे. सदर खरेदीखता प्रमाणे दिंगबर सोपान इंगोले यांना मालमत्ता क्र. ४८ याचे १५०० चौ. फुट क्षेत्राचे मालक वहिवाटदार आहेत,
ग्रामसेवक बामणी ता. सांगोला यांनी कर आकारणी यादी मध्ये सदर दिगंबर सोपान इंगोले यांचे मालमत्ता क्रमांक ४८ चे क्षेत्र ४३५६ चौ. फुट बेकायदेशीरपणे नमूद केले आहे.
सदरचे वाढीव क्षेत्र दिगंबर सोपान इंगोले यांना कोणत्याही कायद्यातील मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील तरतुदीनुसार दाव्यातून प्राप्त झाले नव्हते व नाही, दिगंबर सोपान इंगोले हे स्वतः उपसरपंच या पदावर ग्रामपंचायत बामणी येथे कार्यरत होते
त्यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करून तत्कालीन ग्रामसेवक बामणी ग्रामपंचायत बामणी यांना हाताशी बेकायदेशीर कृत्य केल्याचे दिसून येते.
सदरचे बेकायदेशीरपणे माजी उपसरपंच दिगंबर सोपान इंगोले हे मला व माझे कुटुंबास मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. सदर दिगंबर सोपान इंगोले यांचे खरेदी खतानुसार १५०० चौ. फूट क्षेत्र आहे
तरी ग्रामसेवक बामणी यानी मालमत्ता हस्तांतरणाचा कायदा १८८२ नुसार कोणताही रजिस्टर दस्त नसताना वाढीच क्षेत्र कर आकारणी यादी मध्ये समाविष्ट केले याची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती.
मला उच्चरक्तदाबाचा त्रास असून मी अपंग आहे उत्कालीन ग्रामसेवक व दिगंबर सोपान इंगोले यांचे बेकायदेशीर कृत्यामुळे माझे व माझ्या कुटुबांवर अन्याय झालेला आहे.
याची संपूर्ण चौकशी होऊन मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा अन्यथा मला नाईलाजास्तव तत्कालीन ग्रामसेवक व दिगंबर सोपान इंगोले यांचे निषेधार्थ तहसील कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनी
दि.२६/०१/२०२४ रोजी आमरण उपोषणास बसावे लागेल. असा इशारा प्रभाकर बिचुकले यांनी तहसीलदार सांगोला यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.


0 Comments