google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजयुवा प्रतिष्ठानचा रंगला नवखा काव्य मेळावा.

Breaking News

राजयुवा प्रतिष्ठानचा रंगला नवखा काव्य मेळावा.

 राजयुवा प्रतिष्ठानचा रंगला नवखा काव्य मेळावा.


सांगोला प्रतिनिधी/(समाधान मोरे शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

राजयुवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेला काव्य संमेलन तसेच पुरस्कार वितरणाचा सोहळा 21 जानेवारी 2022 रोजी थाटामाटात संपन्न झाला 

यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून अनेक कवी कवयित्री उपस्थित होत्या 

एकूण 80 कवी कवयित्रींनी कविता सादर केल्या त्याचबरोबर राजयुवा प्रतिष्ठान तर्फे साहित्य सेवा करणाऱ्या संस्थांना साहित्य सेवा हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. 

राजयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव पुंडे उपाध्यक्ष योगेश हरणे या दोन तरुणांची ही झेप खूपच कौतुकास्पद आहे समाजात अशा तरुण पिढीने खरंच साहित्यासाठी पुढाकार घ्यावा असं यांच्या या कर्तुत्वातून दिसून येत आहे. 

संजय वेद पाठक लिखित "काव्य संजीवनी" पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष "डॉक्टर श्रीपाल सबनीस" यांनी भूषविले. यावेळी मा.विमल माळी , बबन पोतदार सर,

आदी मान्यवर उपस्थित होते.. 

गणेश वंदना हा कार्यक्रम विशेष लक्ष वेधक ठरला...कार्यक्रमासाठी स्वागत गीत हभप सौ शुभांगी जाधव यांनी सादर केले....रिदम परिवार कडून जुन्या नव्या गीतांची मैफिल रंगली होती....

कवी संमेलन अध्यक्ष शैलेंद्र भणगे सर , प्रमुख पाहुणे मा.शरदचंद्र काकडे, मा.लक्ष्मण शिंदे, मा गणपत तरंगे तसेच ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, ग्रामीण कवी श्रीराम घडे तसेच पाठ्य पुस्तक कवयित्री

 सौ मृणालिनी कानिटकर हे मान्यवर उपस्थित होते.सौ.मृणालिनी कानिटकर यांनी आपल्या सुंदर कविता सादर करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व रसिक वर्गाची मने जिंकली.

काव्य संमेलन मध्ये एकूण ७० कवींनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे आयोजन खूपच सुंदर केले होते...प्रमोद सूर्यवंशी 

यांनी नाव नोंदणी केली अक्षय तेलोरे आणि सौरभ अहिरे यांनी धावपळीतली काम केली त्याचबरोबर रमेश पाटील , कविता गायकवाड, उमा स्वामी  यांनी देखील कार्यक्रमासाठी खूपच मदत केली.

 सूत्रसंचालन श्रीशैल सुतार सर ,सानवी केळकर मॅडम, ह भ प सौ शुभांगी ताई जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऐश्वर्या नेहेरे व गजानन साबळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments