google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

सांगोल्यातील आलेगावचे सुपुत्र डॉ. विजय फुलारी सर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन

सांगोला  :- छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी मंगळवारी सायंकाळी ही नियुक्ती जाहीर केल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

डॉ. विजय फुलारी हे सांगोला तालुक्यातील आलेगावचे सुपुत्र आहेत ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

 त्यांच्या या निवडीने सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. विजय फुलारी यांची कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments