google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सत्कार स्वीकारायला वेळ; मात्र गुन्हे दाखल करण्यास पोलिस यंत्रणेला मिळेना वेळ सांगोल्यात जनावरांच्या चोऱ्या वाढल्या

Breaking News

सत्कार स्वीकारायला वेळ; मात्र गुन्हे दाखल करण्यास पोलिस यंत्रणेला मिळेना वेळ सांगोल्यात जनावरांच्या चोऱ्या वाढल्या

 सत्कार स्वीकारायला वेळ; मात्र गुन्हे दाखल करण्यास पोलिस यंत्रणेला मिळेना वेळ सांगोल्यात जनावरांच्या चोऱ्या वाढल्या




सांगोला तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय, गुटखा, मटका, सावकारी, दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

या सर्वच धंद्यांतून दोन नंबरचा पैसा येतो. यामुळे तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने शांतता व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.

 सध्या प्रमुख अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्याची चर्चा असून, सध्या पोलिस ठाणे हे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून सत्कार स्वीकारण्याचे केंद्र बनले आहे.

 तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, जनावरे चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या झालेल्या चोऱ्यांचा साधा गुन्हाही दाखल करण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. यामुळे जनतेमधून नाराजी पसरली आहे.

सांगोला तालुक्यात गेली दोन वर्षे खून, जबर मारामारी, चोरी,तकऱ्यांच्या जनावरांच्या चो- आत्महत्या, मुली पळून जा सस्थानक व शाळा प्रवेशद्वारा डगिरी, वाळूची तस्करी, मटव खा, सावकारी आदी अवैध च्या प्रमाणात वाढले आहेत.

  हस्तक्षेपामुळे त्याचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा आहे. सांगो लुक्यात सध्या गरिबांची गाय म्हण ळखली जाणारी शेळी, मेंढी, बोक च्या चोऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणा वाढले आहे.

या चोऱ्यांचा गुन्हा नोंद करण्य तकऱ्यांना पोलिस ठाण्यात हेलप रावे लागत आहेत. गुन्हा दाख लेल्याचा तपासही लागत नाही मुख अधिकाऱ्यांची पदोन्न ल्याची चर्चा असल्याने त्या कार करण्यासाठी तालुक्याती बंध व्यावसायिकां र्यालयामध्ये झुंबड उडाली

 तालुक्यातील होणाऱ्या चोऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. गुन्हेगारांवर, अवैध धंदेवाल्यावर पोलिसांची जरब राहिली नाही.

गुंडगिरी करणाऱ्या लोकांबरोबरच सांगोला येथील पोलिस भर चौकामध्ये चहापान करतात. तसेच अनेकवेळा जेवणावळी करतात. 

या अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांचा जणू छुपा पाठिंबा असल्याचे दिसत आहे. यामुळे शहरासह तालुक्यात शांतता,सुव्यवस्था ढासळली असल्याने सामान्य नागरिक भयभीत आहेत. विद्या मंदिर हायस्कूल, न्यू इंग्लिशस्कूल, वासूद चौक बसस्थानक,

सांगोला महाविद्यालय या ठिकाणी शाळा सुटतेवेळी पोलिसांची नेमणूक करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. 

सध्या तालुक्यामध्ये सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारीचा तपासही लागत नाही. गुन्हेगारांबरोबरचपोलिस यंत्रणेचे सहकार्य असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

 याचे कारण म्हणजे सांगोला पोलिस ठाण्याला आलेले अधिकारी व कर्मचारी यांना पगारापेक्षा वरकमाई मोठी होत असल्याने त्यांच्याकडे महागड्या गाड्या, घरे, प्लॉट, जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे.

सध्या सांगोला तालुक्यात सर्वत्र गुन्हेगारी वाढल्याने अशांतता पसरूलागली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. तालुक्यातील जनता दहशतीच्या दबावाखाली जीवन जगत आहे. 

तालुक्यात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी खमक्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असून पोलिसांची संख्याही वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे.

सांगोला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी यांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

 चोरी झाल्यावर गुन्हा दाखल करून घेण्यासही पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते. गुन्हा दाखल झाला तर त्याचा तपासही लागत नाही.

 त्यामुळे अनेक पशुपालकांनी चोरी होऊनही आपला गुन्हा दाखल केलेला नाही. तालुक्यामध्ये सर्वच अवैध व्यवसाय बोकाळल्याने अशांतता पसरू लागली आहे. -( शिवसेना उ.बा.ठा. सांगोला तालुका संघटक) मा.हरिभाऊ पाटील

Post a Comment

0 Comments