google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोहिते-पाटीलांनीच सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदार करायचं ठरवलंय..!

Breaking News

मोहिते-पाटीलांनीच सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदार करायचं ठरवलंय..!

 मोहिते-पाटीलांनीच सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदार करायचं ठरवलंय..!


सांगोला तालुका कायमच स्व.गणपत आबासाहेबांवर प्रेम करणारा तालुका सोलापूर जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणात स्व. गणपत आबा देशमुख यांनी माजी

 उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना कायमच साथ दिली.सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद, दूध संघ विविध संस्था असतील

 त्यात एकत्र येत विजयदादा व स्व. गणपत आबा निर्णय घेत.स्व.गणपत आबा देशमुख यांनी आपल्या तह हायात राजकीय जिवनात आपला दुष्काळग्रस्त सांगोला तालुका सुजलाम सुफलाम व्हा

 इथल्या तरूणांना दुष्काळा पाण्या अभावी मुंबई पुण्यात रोजगारासाठी जाऊ लागू नये त्यांना आपल्याच तालुक्यात काम मिळावे म्हणून सांगोला तालुक्यातील प्रत्येक गा-वात पाणी यावे म्हणून संघर्ष केला त्याला काही प्रमाणात का होईना यश आले

 टेंभू म्हैसाळचे थोडेफार पाण्याने तालुक्यातील काही जमीन भिजली देखील स्व. गणपत आबा आपल्या शेवट पर्यंत आपल्या पाण्यासाठी झटले पाण्यासाठीच जगले..

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे देखील आपल्या राजकीय करिअर पणाला लावत निरा देवघर योजना पूर्ण केली व कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना अस्तित्वात आणली व आता देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला वर्ल्ड बँकेकडून फायनान्स उपलब्ध केलेला आहे. 

संकल्पित योजना पूर्णत्वाच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर आहे या योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुका संपूर्ण सुजलाम सुफलाम होणार आहे.स्व.गणपत आबाचे स्वप्न विजयसिंह मोहिते-पाटीलांच्या माध्यामातून पूर्ण होणार आहे.

काल झालेल्या सांगोला येथील डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या स्पर्धेदरम्यान धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी आम्ही कुठल्याही पक्षात असलो 

तरी डॉ. बाबासाहेब देशमुख आणि आमच्या मैत्रीत कसले अंतर पडणार नाही डॉ. बाबासाहेब देशमुख आमच्या परिवारातील एक सदस्यआहेत त्यांना एकटे पडू देणार नाहीत हे उपस्थित जनसमुदायाला सांगितले.. 

खरतर मोहिते-पाटील आपले राजकीय पत्ते कधीच ओपन करत नाहीत मात्र सांगोल्यात राजकीय वजाबाकीचा विचार न करात डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उघड पाठींबा दिल्याने

 मोहिते- पाटील व देशमुख कुटुंबियांची राजकीय सामाजिक विण घट्ट आहेदिसते.स्व.गणपत आबा नंतर नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला व सातशे मतांनी डोंगर झाडी हाटेल फेम शहाजी पाटील आमदार झाले

 त्यानंतर बरेच राजकीय पाणी पुलाखालून वाहून गेले. स्व.गणपत आबाचे कार्य त्यांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुढे चालू ठेवले..

 व सोलापूर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब पालकत्व यांचे राजकीय मोहिते-पाटलांनी स्वीकारल्याचे धैर्यशिल मोहिते- पाटील यांच्या वक्तव्यावरून समजते. मोहिते-पाटलांचे समर्थक धैर्यशिल भैय्यांच्या नावे माढा लोकसभेसाठी आमचं ठरलय

 म्हणतच आहेत मात्र विजयदादा, रणजित दादा व धैर्यशिल भैय्या या तिघांची कार्यक्रमाला उप-स्थिती म्हणजे दस्तुरखुद्द मोहिते-पाटीलांनीच सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदार करायचं ठरवलंय..!

Post a Comment

0 Comments