सांगोला तालुक्यामधील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील
व कालिदास कसबे यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू.
सांगोला प्रतिनिधि :- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यामधील चिंचोली गावचे हरिभाऊ पाटील व कालिदास कसबे हे दि.०१/०१/२०२४ पासून तहसील कार्यालय सांगोला या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत
जोपर्यंत संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.तरी त्यासंबंधी प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे:-
१. सांगोला तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा करणे ई-निविदा प्रक्रिया सदोष राबविले.प्रकरणी चौकशी समिती नेमली असता ती चौकशी समिती मुदत संपून.२ महिने झाले
तरी चौकशी जाणूनबुजून करीत नसलेने या चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणेबाबत दि.०८.०१.२०२४ पासून बेमुदत धरणे आंदोलन
२. सांगोला पाटबंधारे उपविभाग सांगोला यांचेकडील शाखा अभियंता तसेच उपविभागीय अभियंता व भिमा
पाटबंधारे विभाग पंढरपूर कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने व साखळी पध्दतीने भ्रस्टाचार करुन बोगस बिले व नियम बाह्य निविदा केल्याने यांची तात्काळ बडतर्फी होणेबाबत...
३. उपविभागीय अभियंता निरा-उजवा कालवा उपविभाग पंढरपूर तसेच निरा-उजवा कालवा फलटणचे कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांनी नियमाप्रमाणे टेल टु हेड पध्दतीने पाणी वाटप व्हावे
इत्यादी न्याय मागणीसाठी दि. १/१/२०२४ पासून संबधीतावर कारवाई होईपर्यंत व पाणीवाटप न्याय मिळेपर्यंत शासकीय कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन.
कालिदास कसबे :- गेली २ महिन्यांपासून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा विभागाची कोणतेही चौकशी समिती करत चौकशी नाही.
हरिभाऊ पाटील:- सांगोला तालुक्यामध्ये टेल टु हेड पध्दतीने पाणी वाटप व्हावे.पाटबंधारे विभाग पंढरपूर कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने व साखळी पध्दतीने भ्रस्टाचार करुन बोगस बिले व नियम बाह्य निविदा केलेले आहे त्यांची योग्य चौकशी व्हावी
0 Comments