google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...कर्ज घेतले दाढीवाल्याने गुन्हा दाखल मिशीवाल्यावर! खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप अभिजित पाटील - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष

Breaking News

मोठी बातमी...कर्ज घेतले दाढीवाल्याने गुन्हा दाखल मिशीवाल्यावर! खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप अभिजित पाटील - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष

मोठी बातमी...कर्ज घेतले दाढीवाल्याने गुन्हा दाखल मिशीवाल्यावर!


खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप अभिजित पाटील - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील कट्टर समर्थक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष

 अभिजीत पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत राज्य सहकारी बँकेने आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार दिली होती.

अभिजीत पाटील हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून ते पंढरपूर जवळच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे

 जवळपास साडेचारशे कोटीहून अधिक थकीत रक्कम आहे. ही थकीत रक्कम कारखान्याने बँकेकडे भरली नसल्याने राज्य सहकारी बँकेने पंढरपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. 

त्यानुसार रात्री उशिरा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह वीस संचालकांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बँकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जातात. जून 2022 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये

 अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडून आले आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतले आहे. 

ते आज मितीस जवळपास साडेचारशे कोटीहून अधिकची रक्कम थकीत आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय द्वेषा पोटी माझ्यावर आणि संचालक मंडळावर गुन्हा 

दरम्यान राजकीय द्वेषा पोटी माझ्यावर आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली आहे. मी अध्यक्ष होण्यापूर्वी घेतलेले हे कर्ज आहे. 

परंतु राजकीय सूडबुद्धीने केवळ आमच्या संचालक मंडळावर ही कारवाई केली आहे. दरम्यान पाटील यांना जिल्हा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

 तत्कालीन अध्यक्ष कै भारत भालके व अध्यक्षांनी कारखान्यावर वेळोवेळी कर्ज घेतले आहे. ते कर्ज थकीत आहे मात्र ते कार्यरत असताना राज्य बँकेने कधी कारवाई केली नाही.

 दाढी वाले अध्यक्ष पाय उतार झाल्यावर मी अध्यक्ष झालो. माझा मागील कर्जाशी काहीही संबंध नाही तरीही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई केवळ राजकीय सूडबुद्धीने केली आहे.

अभिजित पाटील - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष

Post a Comment

0 Comments