google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पहिले पुष्प निवडणूक संपन्न विद्यार्थी शिक्षक दिन व प्राचार्य,जनरल सेक्रेटरी, विद्यार्थींनी प्रतिनिधी यांची झाली निवड

Breaking News

सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पहिले पुष्प निवडणूक संपन्न विद्यार्थी शिक्षक दिन व प्राचार्य,जनरल सेक्रेटरी, विद्यार्थींनी प्रतिनिधी यांची झाली निवड

 सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन पहिले पुष्प निवडणूक संपन्न विद्यार्थी शिक्षक दिन व प्राचार्य,जनरल सेक्रेटरी, विद्यार्थींनी प्रतिनिधी  यांची झाली निवड


सांगोला :-  सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे  वार्षिक स्नेहसंमेलन २०२३- २४ दिनांक २६,२७,२८ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होणार आहे 

यासाठी  इयत्ता पाचवी ते दहावी प्रशालेतून व ज्युनिअर कॉलेजमधून  निवडणूकीद्वारे मतदानातून वर्गप्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधींच्या मतदानातून विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्य,जनरल सेक्रेटरी, विद्यार्थींनी प्रतिनिधी  यांची  निवड झाली.

यामध्ये सन २०२३-२४ वार्षिक स्नेहसंमेलन प्रशाला विद्यार्थी शिक्षक दिन मुख्याध्यापक यशराज अशोक पवार इयत्ता १० वी ड, जनरल सेक्रेटरी वैष्णव सचिन वसमळे 

इयत्ता  ९ वी क, विद्यार्थींनी प्रतिनिधी  साक्षी संभाजी देवकते इयत्ता ८ वी ड  व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्य श्रीशैल्य ज्ञानेश्वर तेली

 इयत्ता बारावी वाणिज्य, जनरल सेक्रेटरी  अथर्व चंद्रशेखर स्वामी इयत्ता बारावी शास्त्र ब,विद्यार्थींनी प्रतिनिधी  भारती रामचंद्र बनकर इयत्ता अकरावी वाणिज्य यांची  निवड झाली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव म.शं.घोंगडे, 

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे,  उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते,उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक पोपट केदार यांचे हस्ते व प्रशाला निवडणूक विभाग प्रमुख 

उत्तम सरगर,सहाय्यक निवडणूक  विभाग दादासाहेब वाघमोडे, ज्युनिअर कॉलेज निवडणूक विभाग प्रमुख प्रा.डी.के.पाटील , सहाय्यक निवडणूक विभाग प्रा.शिवशंकर तटाळे, प्रशाला उत्सव

 विभाग प्रमुख नरेंद्र होनराव व ज्युनिअर कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते‌‌.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, 

संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था  सदस्य, पर्यवेक्षक अजय बारबोले,बिभिषण माने ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.

या निवडणुकीमध्ये वर्गप्रतिनिधींची निवड करताना  प्रथम सत्र परीक्षेमध्ये सर्व विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून उभा राहता आले व त्यांना संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे मतदान होते. 

यातून निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधींच्या मतदानातून विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्य, जनरल सेक्रेटरी व विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवड झाली. 

त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पहावयास मिळाली व त्यातूनच लोकशाहीची मूल्ये,ती जपण्याची आवश्यकता,आपण मतदान हक्क का बजावायचा ? हे विद्यार्थ्यांना कळले व  शालेय जीवनातच राजकारणाचे धडे मिळाले..

Post a Comment

0 Comments