google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना..माजी सभापतीने छाटले तरुणाचे दोन्ही हात; धक्कादायक कारण समोर

Breaking News

खळबळजनक घटना..माजी सभापतीने छाटले तरुणाचे दोन्ही हात; धक्कादायक कारण समोर

  खळबळजनक घटना..माजी सभापतीने छाटले तरुणाचे दोन्ही हात; धक्कादायक कारण समोर


ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे हात छाटल्याची घटना घडली आहे.

 मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीने गावातील तरुणावर भररस्त्यात आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने सपासप वार करून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुरबाडमध्ये पोलिसांच्या गस्तीने सर्वत्र शांतता व सुव्यवस्था असतानाच आज संध्याकाळी मुरबाड बारवी धरण रस्त्यावर विस्डम शाळेसमोर देवपे गावातील तरुण सुशील भोईर (वय 27 वर्ष) हा रिक्षाने जात

 असताना मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ हे आपल्या साथीदारांसह कारने येऊन रिक्षा अडवली.

 सुशीलला बाहेर काढून तलवारीने सपासप वार करीत दोन्ही हात छाटून टाकले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

 याप्रकरणी श्रीकांत धुमाळ याच्यासह त्याचा मेहुणा अंकुश खारीक, नितीन धुमाळ व इतर यांच्यावर मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments