google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एक धक्कादायक घटना समोर दीड वर्षांची चिमुकली, पोटात 6 महिन्यांचा गर्भ विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, वडिलांना कॉल केला अन्…

Breaking News

एक धक्कादायक घटना समोर दीड वर्षांची चिमुकली, पोटात 6 महिन्यांचा गर्भ विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, वडिलांना कॉल केला अन्…

 एक धक्कादायक घटना समोर दीड वर्षांची चिमुकली, पोटात 6 महिन्यांचा गर्भ विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, वडिलांना कॉल केला अन्…


एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. 

विवाहितेनं आत्महत्येपूर्वी आपल्या वडिलांना कॉल केला होता, वडील तिला घ्यायला सासरी येणार होते,

 मात्र त्यापूर्वीच तीने टोकाचं पाऊलं उचललं. अलका पवन मुटकेर असं या महिलेचं नाव आहे. अलका यांना एक दीड वर्षांची मुलगी देखील आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पती सतत दारू पिऊन छळ करायचा, वारंवार विनंती करूनही त्याचे विवाहबाह्य संबंध थांबले नाहीत. 

हे कृत्य नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर थांबवण्याचे त्याने कबूल देखील केले होते. मात्र, त्रास कमी झालाच नाही. शेवटी कंटाळून 6 महिन्यांची गर्भवती असलेल्या अलका पवन मुटकेर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी मध्यरात्री 2 वाजता पती घरी परतल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. आत्महत्येपूर्वी अलका यांनी आपल्या वडिलांना कॉल केला होता. 

वडील मुलीला घेऊन जाण्यासाठी येणार होते. मात्र, अलका यांनी त्यापूर्वीच आपलं आयुष्य संपवले. काही तासांतच वडिलांना मुलीच्या मृत्यूचा कॉल गेला. 

या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीसह त्याच्या भावाला अटक केली.

Post a Comment

0 Comments