google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शेतकरी महिला सूतगिरणीची निवडणूक कार्यक्रम जाहीर

Breaking News

सांगोला शेतकरी महिला सूतगिरणीची निवडणूक कार्यक्रम जाहीर

सांगोला शेतकरी महिला सूतगिरणीची निवडणूक कार्यक्रम जाहीर


सांगोल्यातील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. ता. ४ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ८ डिसेंबरपर्यंत आहे.

तर ७ जानेवारी २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. स्थापनेपासूनच बिनविरोध होत असलेल्या शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीची निवडणूक होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सहकार निवडणूक प्राधिकरणाने सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. २२ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

 सूतगिरण्यांच्या कर्जावरील व्याज सरकार भरणार

शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ११ डिसेंबर रोजी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

१२ ते २६ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. २७ डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांनी दिली.

सभासद वगळल्यामुळे सांगोल्यात चर्चा

या निवडणुकीसाठी शेअर्सची रक्कम पूर्ण न भरल्यामुळे सुमारे २४ हजार सभासद मतदार प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. महिला सूतगिरणीचे २६ हजार २७० सभासद असून २ हजार ३५६ सभासदांनी शेअर्सची रक्कम पूर्ण भरली आहे.

२३ हजार ९१४ सभासदांना मतदान प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. २०१३ पासून प्रत्येक वार्षिक सभेत शेअर्स पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. ज्या सभासदांनी शेअर्स पूर्ण आहेत, त्यांचीच नावे अंतिम मतदार यादीत आहेत. ज्या सभासदांचे शेअर्स पूर्ण आहेत, त्यांचीच माहिती प्रादेशिक उपायुक्तांना दिली आहे.

Post a Comment

0 Comments